बसफे:यांचा प्रश्न सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:21 AM2017-09-20T11:21:39+5:302017-09-20T11:21:39+5:30
धनपूर-सिलींगपूर मार्ग : कायमचा तोडगा काढण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धनपूर-सिलींगपूरसह विविध मार्गावरील बसफे:यांचा प्रश्न अद्यापही कायम आह़े ग्रामस्थांनी मार्गाची तात्पुरती डागडूज्जी केली होती़ परंतु अद्यापही बससेवा सुरु होत नसल्याचे वृत्त आह़े
अक्कलकुवा आगारप्रमुख अनुजा दुसाने यांच्याकडून तळोदा तालुक्यातील गावांतील रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े यानंतर जो मार्ग वाहतुकीस योग्य नाही अशा मार्गावरील बसफे:या बंद करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे ये-जा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होत़े एकीकडे संबंधित प्रशासन रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देत नाही़ तर दुसरीकडे एसटी महामंडळाकडून बससेवा बंद करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे यावर तोडगा म्हणून धनपूर-सिलींगपूर येथील युवकांनी तसेच ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्त्याची डागडूज्जी करुन खड्डयांवर मुरुम टाकला होता़ त्यानंतर पुन्हा अक्कलकुवा आगाराकडे बससेवा सुरु करण्याची मागणी केली होती़ त्यानुसार अक्कलकुवा आगारप्रमुख दुसाने यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी केली असता रस्त्यांची स्थिती जैसे थे असल्याचे त्यांना आढळून आल़े त्यामुळे या मार्गावर बससेवा सुरु करावी की नाही यावर कुठलाही तोडगा अद्याप निघालेला नाही़ दरम्यान संबंधित प्रशासनानेच याबाबत ठाम भूमिका घेत मार्गाची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा आह़े
तळोदा तालुक्यातील बहुतेक बसफे:या सध्या कात्रीत सापडल्या आहेत़ पितृपक्ष तसेच दिवसेंदिवस घटत जाणारी प्रवाशांची संख्या यामुळे एसटी महामंडळ हवालदील झाले आहेत़ त्यातच नादुरुस्त असलेल्या मार्गावरुन एसटी बसेसना हाकने दिवसेंदिवस कठीण जात आह़े त्यामुळे यावर अक्कलकुवा आगाराकडून ठाम भूमिका घेत बससेवा बंद करण्यात आल्या आहेत़ परंतु दुसरीकडे याला ग्रामस्थांचा विरोध कायम असून एसटी बसेसच्या फे:या त्वरीत सुरु कराव्या अशी मागणी आता जोर धरु लागली आह़े