बसफे:यांना हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:32 PM2017-10-05T12:32:06+5:302017-10-05T12:32:06+5:30

धनपूर-सिलींगपूर मार्ग : विद्याथ्र्याच्या परीक्षे दरम्यान बसफे:या राहतील सुरु

 Bashe: The green lanterns | बसफे:यांना हिरवा कंदील

बसफे:यांना हिरवा कंदील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परीक्षांच्या कालावधी दरम्यान, तळोदा तालुक्यातील धनपूर-सिलींगपूर तसेच प्रतापपूर आदी मार्गावरील बसफे:या सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय अक्कलकुवा आगाराकडून घेण्यात आला आह़े त्यामुळे निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आह़े 
वाहतुकीस अयोग्य असलेल्या रस्त्यांवरील बसफे:या बंद करण्याचा निर्णय अक्कलकुवा आगाराकडून घेण्यात आला होता़ त्यामुळे तेव्हापासून धनपूर-सिलींगपूर या मार्गावरील बसफे:या धोक्यात आल्या आहेत़ ग्रामस्थांनी यासाठी अजर्-फाटे करुनही काही उपयोग झाला नव्हता़ खराब रस्त्यांमुळे या मार्गावरील बसफे:या बंद ठेवण्याचा तसेच जोर्पयत रस्ते वाहतुकीस योग्य होत नाही, तोर्पयत या मार्गावर बससेवा बंदच ठेवण्याचा धाडसी निर्णयही अक्कलकुवा आगाराकडून घेण्यात आला होता़ परंतु आता विद्याथ्र्याच्या परीक्षा जवळ येत असल्याने अक्कलकुवा आगाराकडून केवळ त्याच कालावधीपुरता ही बससेवा सुरु करण्यात येणार असल्याचेही बजावण्यात आले आह़े 
अक्कलकुवा आगाराकडून तळोदा तालुक्यांतील रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े यात जे मार्ग वाहतुकीस योग्य नाहीत अशा मार्गावरील बससेवा स्थगित करण्यात आली होती़ बससेवा बंद करण्यात आल्याने धनपूर-सिलींगपूर येथील विद्याथ्र्यानी या मार्गाची तात्पुरती डागडुज्जी करण्यात आली होती़ परंतु अक्कलकुवा आगाराकडून पुन्हा करण्यात आलेल्या सव्रेक्षणात रस्त्यांची स्थिती जैसे थे असल्याचे आढळून आले होत़े याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ व अक्कलकुवा आगाराच्या समस्या जाणून घेतल्या होत्या़ परंतु याचादेखील फारसा परिणाम झाला नव्हता़ आता परीक्षांच्या काळात आगाराकडून या मार्गावरील बससेवा सुरु करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे काही दिवसांसाठी हा प्रश्न सुटला असला तरी परीक्षा झाल्यावर याबाबत काय निर्णय घेतला जातो याबाबत प्रश्नचिन्ह कायम आह़े 
स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा़
गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील बसफे:यांचा प्रश्न एैरणीवर आला आह़े धनपूर-सिलींगपूर मार्गावरील बससेवा बंद केल्यानंतर  अक्कलकुवा आगार विरुध्द ग्रामस्थ असे लढाईचे स्वरुप निर्माण झाले आह़े बससेवा बंद करण्यात आल्यामुळे अनेक वेळा ग्रामस्थांनी अक्कलकुवा आगाराला अर्ज विनंती केली़ तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या पुढाकाराने अनेक बैठकादेखील झाल्या परंतु यावर अंतीम तोडगा निघू शकलेला नाही़ त्यामुळे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीच लक्ष देत रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
दरम्यान, या मार्गावरील बससेवा बंद झाल्यामुळे विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े या मार्गावरील खराब रस्त्यांचा फटका विद्याथ्र्याना या माध्यमातून बसत असल्याने पालकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 
रस्ते दुरुस्तीची मागणी कायम
तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील बहुतेक रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली आह़े त्यामुळे याचा फटका विद्याथ्र्यासह सर्वानाच बसत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे अक्कलकुवा आगाराकडून या मार्गावरील बसफे:या बंद करण्यात आल्या होत्या़ व रस्ते दुरुस्त केल्याशिवाय या मार्गावरील बसफे:या सुरु करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आह़े या आपल्या निर्णयावर अक्कलकुवा आगार ठाम आह़े

Web Title:  Bashe: The green lanterns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.