सीमकार्डसाठी ‘आधार’ची सक्ती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:52 AM2018-10-03T11:52:57+5:302018-10-03T11:53:02+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष : आधार हे एकमेव ई-केवायसी झालेले डॉक्युमेंट
नंदुरबार : सुप्रिम कोर्टाने आधारच्या सक्तीबाबत महत्त्वपूर्ण निकाल देत बँक खाते तसेच सिमकार्ड खेरदीसाठी आधारची सक्ती करणे अवैध ठरवले आह़े या निकालामुळे सामान्यांना दिलासा मिळेल असे वाटत असताना नंदुरबार शहरात मोबाईल सिमकार्ड खरेदी करणा:या नागरिकांना आधारची सक्ती केली जात आह़े
शहरातील बसस्टँड परिसर, बाजारपेठ, मंगळबाजार, सिंधी कॉलनी या भागात विविध सिमकार्ड विक्रेत्यांसोबत संपर्क केल्यावर त्यांनी आधार कार्ड नसेल तर आधार क्रमांक सक्तीचा असल्याची माहिती दिली़ तब्बल 15 पेक्षा अधिक विक्रेत्यांनी आधारशिवाय सिमकार्ड देण्यास नकार दिला़ शहरात बसस्टँड परिसरात विविध कंपन्याचे प्रतिनिधी हे संबधित कंपनीच्या लोगोची छत्री घेत बसतात त्यांना कोणतेही कागदपत्र दिल्याशिवाय केवळ आधार क्रमांकाने सिमकार्ड रजिस्टर्ड केले जात़े विशेष म्हणजे केंद्रशासनाच्या भारतीय दूरसंचार खात्याकडून चालवल्या जाणा:या कंपनीचे सिमकार्डही आधारविना देण्यास नकार देण्यात आला़ आधार व्यतिरिक्त पॅनकार्ड, मतदारकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आणि बँक पासबुकची ङोरॉक्स ही एखाद्या सीमकार्डच्या खरेदीसाठी ग्राह्य धरली जात़े परंतू ही चारही कागदपत्रे घेण्यास सिमकार्ड विक्रेत्यांनी नकार दिला़ आधार क्रमांक दिल्यावर केवळ पाच ते सात मिनीटात दुसरे सीमकार्ड अॅक्टीव्हेट करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली़ बायोमेट्रिक मशिनवर थंब इंम्प्रशेन दिल्यानंतर तसेच आधारकार्डचा क्रमांक दिल्यावर ओळख होऊन सिस्टीममध्ये नोंद होत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली़ बसस्थानक परिसरात 5 दुकानांमधून दर दिवशी किमान 15 ते 20 सीमकार्ड विक्री होत आहेत़ यात विद्याथ्र्याची सर्वाधिक संख्या असल्याचे सांगण्यात आल़े या सर्वासाठी आधाच सक्तीचे असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आल़े