चिवलउतार येथे उपसरपंचास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:10 PM2019-07-13T12:10:59+5:302019-07-13T12:11:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामपंचायत संदर्भात तक्रारी करतात या वादातून उमरागव्हाण ता़ अक्कलकुवा येथील उपसरपंचास मारहाण करण्यात आली़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ग्रामपंचायत संदर्भात तक्रारी करतात या वादातून उमरागव्हाण ता़ अक्कलकुवा येथील उपसरपंचास मारहाण करण्यात आली़ ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता चिवलउतार ता़ अक्कलकुवा येथे घडली़
उमरागव्हाण येथील उपसरपंच शंकर खाअल्या वसावे हे शिवाजी मागा वसावे यांच्यासह अक्कलकुवा येथे जात असताना चिवलउतार येथे किसन ईद्या वसावे, दिनेश खात्र्या वसावे, संपत खात्र्या वसावे, धिरसिंग खात्र्या वसावे, काल्या खात्र्या वसावे, ठोब्या खात्र्या वसावे, विजय कांगा वसावे, सिमाबाई दिनेश वसावे, महेंद्र दिलीप वसावे सर्व रा़ चिवलउतार यांनी अडवून वाद घालण्यास सुरुवात केली़
शंकर वसावे हे ग्रामपंचायत संदर्भात तक्रारी करत असल्याचे त्यांचे म्हणणे होत़े दरम्यान सर्व 9 संशयितांसह 30 लोकांच्या जमावाने शंकर वसावे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ बांबूच्या काठय़ांनी उपसरपंच वसावे व शिवाजी वसावे या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली़ दरम्यान संशयितांनी दोघांना जबरीने टेम्पोत बसवून अक्कलकुवा येथे नेले होत़े याठिकाणी आमश्या वसावे याने एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात दोघांना दमदाटी केली होती़ मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आह़े याप्रकरणी रात्री उशिरा शंकर वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चिवलउतार येथील 9 आणि अक्कलकुवा येथील एका संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे करत आहेत़ रात्री उशिरार्पयत दोन्ही गटातील समर्थकांची मोलगी पोलीस ठाण्यात गर्दी झाल्याची माहिती आह़े