वैयक्तीक हेव्यादाव्यांमुळे नवागाव येथे बचत गटाची मुस्कटदाबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:49 PM2019-02-09T12:49:26+5:302019-02-09T12:49:30+5:30
नंदुरबार : जिल्हास्तरीय समितीकडून रास्तभाव दुकानासाठीची प्राथम्य क्रमानुसार मंजूरी मिळूनही तळोदा येथील देवमोगरा महिला बचत गटास प्रत्येक्ष काम सुरु ...
नंदुरबार : जिल्हास्तरीय समितीकडून रास्तभाव दुकानासाठीची प्राथम्य क्रमानुसार मंजूरी मिळूनही तळोदा येथील देवमोगरा महिला बचत गटास प्रत्येक्ष काम सुरु करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े याकडे संबंधित ग्रामसेवक व अधिका:यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आह़े
तळोदा तालुक्यातील नवागाव येथे रास्तभाव दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी धनलक्ष्मी महिला बचतगट, एकविरादेवी महिला बचतगट, ममता महिला बचतगट, आप की जय महिला बचतगट, देवमोगरा महिला बचतगट व सरस्वती महिला बचतगट आदींकडून अर्ज प्राप्त करण्यात आले होत़े त्यानुसार जिल्हास्तरीय समितीकडून प्राथम्य क्रमवारीनुसार देवमोगरा महिला बचतगटास रास्तभाव दुकान मंजूर करण्यासाठी शिफारस केली आह़े परंतु संबंधित गावातील सरपंचांनी विश्वासात न घेता परस्पर पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करुन देवमोगरा बचतगट रास्तभाव दुकान चालविण्यास तयार नसल्याचे सांगून हा परवाना सरस्वती महिला बचत गटाला द्यावा असा दावा केल्याचा आरोप आह़े गावात महिला ग्रामसभा घेऊन त्यानुसार सर्वानुमते महिला बचत गटाची निवड करणे आवश्यक असताना जाणूनबुजून महिला ग्रामसभा घेतली जात नसल्याचा आरोप देवमोगरा महिला बचत गटाकडून होत आह़े याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश पुरवठा अधिका:यांकडून संबंधित ग्रामसेवकांना दिले आह़े तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत आह़े याबाबत देवमोगरा महिला बचत गटाच्या अध्यक्षा बबीता मोरे व अलका वळवी यांनी रेशन दुकानाचा परवाना आपणास मंजुर असून रेशन दुकान चालविण्यास सक्षम असल्याचा दावा निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाकडे केला आह़े परंतु स्थानिकांच्या वैयक्तीक स्वार्थामुळे हा परवाना मिळू दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आह़े