सामाजिक असंतोषामुळे वर्ग संघर्ष वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:26 AM2018-03-12T11:26:18+5:302018-03-12T11:26:18+5:30

भाकपा राज्य अधिवेशनाचा समारोप : राज्य कार्यकारिणीचे गठन

Because of social discontent, class struggle has increased | सामाजिक असंतोषामुळे वर्ग संघर्ष वाढला

सामाजिक असंतोषामुळे वर्ग संघर्ष वाढला

Next

लोकमत ऑनलाईन
शहादा, दि़ 12 : राज्यात दलित-मराठा अस्मितेचा प्रश्न तीव्र होत आह़े आर्थिक, सामाजिक व राजकीय कारणे वेगवेगळी असली तरी अंसतोष वाढत असल्याने वर्गामध्ये संघर्ष निर्माण होत असल्याचे प्रतिपादन भाकपाचे राज्यसचिव डॉ़ भालचंद्र कांगो यांनी केल़े भाकपाच्या 23 व्या राज्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते शहादा येथे बोलत होत़े 
यावेळी मंचावर मनोहर टाकसाळ, स्मिता पानसरे, कॉम्रेड रायलू, तुकाराम भस्मे, माणिक सूर्यवंशी, मोहन शेवाळे, ईश्वर पाटील, दंगल सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े 
पुढे बोलताना कांगो म्हणाले की, कम्युनिस्टांनी येत्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या प्रश्नांना समजून घेतले पाहिज़े एकीकडे दलित समाजाला पुन्हा जाती व्यवस्थेतून चटके दिले जात आहेत़ सामान्यातील सामान्य, गरीब, आदिवासी-दलित हे संघर्षाच्या खाईत ढकलले गेले आहेत़ भाकपाच्या कार्यकत्र्यानी त्यांच्या संघर्षाला जागा करून दिली पाहिज़े जनआंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत़ एखादा मोर्चा काढल्यानंतर त्यात किती लोक आले, हे पाहण्यापेक्षा लोकांसाठी किती काम केले, याचे भान ठेवले पाहिज़े 
शेवटी भालचंद्र कांगो म्हणाले की, सत्तेत असलेल्या राज्य सरकारने शिक्षण व आरोग्याचे बाजारीकरण केले आह़े आदिवासींसाठी असलेल्या आश्रमशाळा बंद करण्याचा घाट घातला आह़े शिक्षणावर केवळ 6 तर आरोग्य 4 टक्के निधी खर्च करून त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांबाबतची उदासिनता दाखवून दिली आह़े 
प्रारंभी विविध 20 ठराव मांडून त्यावर चर्चा करण्यात आली़ ठरावाचे वाचन पंकज चव्हाण, गिरीष फोंडे, मिलींद रानडे, माधुरी क्षीरसागर, महेश कोपुलवार, नामदेव चव्हाण, मानसी बाहेती, अशोक सोनारकर, विश्वास उटगी, राजू देसले, शाम काळे, अभय टाकसाळे, शिवकुमार गणवीर, राम बाहेती, सुकुमार देसले, ममता सुंदरकर, अॅड़ जगदीश मेश्राम, प्रदीप मोरे यांनी ठरावांचे वाचन केल़े प्रत्येक ठरावाचे पूर्णपणे वाचन केल्यानंतर आवाजी मतदानाने तो संमत करण्यात आला़ यावेळी स्मिता पानसरे यांनी प्रत्येकाचे मत जाणून घेतल़े त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना ठरावांची माहिती दिली़ भाकपाच्या राज्य कार्यकारिणीकडून माणिक सूर्यवंशी, मोहन शेवाळे, ईश्वर पाटील यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पुस्तके भेट देण्यात आली़ सूत्रसंचालन संजय देसले यांनी तर आभार ईश्वर पाटील यांनी केल़े अधिवेशनस्थळाला कॉम्रेड ए़बी़वर्धन, सभागृहाला कॉम्रेड गोविंद पानसरे तर व्यासपीठाला मनोहर देशकर यांची नावे देण्यात आली होती़ समारोपापूर्वी विविध 20 ठराव करण्यात आले होत़े 
समारोप कार्यक्रमात भाकपाची राज्य कार्यकारिणी गठीत करण्यात आली़ यात 71 प्रतिनिधींची पक्षाच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली़ समितीचे गठन मावळते राज्यसचिव भालचंद्र कांगो यांनी निवड प्रक्रिया पार पाडली़ यात राज्य सरचिटणीस पदावर तुकाराम भस्मे यांची निवड करण्यात आली़ तर सहसचिव म्हणून सुभाष लांडे, नामदेव गावडे, स्मिता पानसरे, नामदेव चव्हाण, राम बाहेती, प्रथांशू रेड्डी यांच्यासह 21 सदस्यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली़ दरम्या 29 एप्रिल रोजी केरळ राज्यात भाकपाचे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार आह़े यात माणिक सूर्यवंशी, मोहन शेवाळे, ईश्वर पाटील यांच्यासह राज्यातील 11 पक्ष पदाधिका:यांची निवड यावेळी करण्यात आली़  
 

Web Title: Because of social discontent, class struggle has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.