बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:15 PM2019-06-30T12:15:54+5:302019-06-30T12:16:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची दोन वर्षापासून अक्षरश: चाळण झालेली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याची दोन वर्षापासून अक्षरश: चाळण झालेली आहे. बेडकी ते चिंचपाडा या 15 किलोमीटर अंतरात येणा:या तीन पुलांची अत्यंत दयनिय अवस्था झाल्याने अधिकारी महाड सारखी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत की, काय असा प्रश्न उपस्थित होत असून, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या 93 लाख रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम करणा:या कंपनीकडून कामे होत नसल्याने रस्त्याचे अर्धवट काम झाले आहे. त्यामुळे जागो जागी वळण रस्ते करून ठेवले आहेत. महामार्गावरुन होत असलेली अवजड वाहतूक पाहता रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले असल्याने वाहतुकदारांमधून रस्ता दुरुस्तीसाठी दबाव वाढल्याने 93 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक कार्यकत्र्याकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका:यांना रस्त्याची दुर्दशा व होत असलेले अपघात याबाबत अवगत करुन दिले होते.
आंदोलनाच्या माध्यमातून व पाठपुरावा केल्याने ब:याच कालावधी नंतर रस्ता दुरुस्तीची सुरुवात करण्यात आली. माती मुरुमाचा भराव व थातुर मातुर अर्धवट दुरुस्ती केल्याने महामार्गावरील नियमित अवजड वाहतुकीमुळे पहिल्याच पावसात रस्त्याची दयनिय अवस्था पूर्ववत झाली आहे. रोजच होणारी वाहतुकीची कोंडी व होणारे अपघात पाहता पावसाळ्यात या रस्त्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भ्वणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने 93 लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवले आहेत. सामाजिक कार्यकर्ते मं.गं. येवले व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी 25 जून रोजी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे व निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिका:यांना जवाबदार ठरविण्यात येऊन त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे येथील अधिका:यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम अर्धवट सोडून लोकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ होत असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडल्यास संबधित अधिका:यांची जवाबदारी निश्चित करावी. रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर झालेले 93 लाख रुपये कोठे व कसे वापरण्यात आले याबाबत चौकशी करून कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.
बेडकी ते चिंचपाडा या 15 किलोमीटर अंतरात वाकीपाडा, नवापूर शहर व रांयगण येथील तीन पुलांची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. तिनही पूल क्षतीग्रस्त झाल्याने पूल पार करतांना वाहनचालक जीवमुठीत धरून मार्गक्रमण करीत आहेत. याआधीही या पुलांची दुर्दशा व दुरुस्ती झाली आहे. मात्र अशी दुरुस्ती अल्पकाळ टिकून राहिल्यानंतर परिस्थिती जैसे थे होत आली आहे. हे पाहता 93 लाख रुपये खर्चात तिनही पुलांची तातडीने व चांगल्या स्वरुपाची गुणात्मक व दर्जेदार अशी दुरुस्ती होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे झाले नसल्याने अधिकारी महाड सारखी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.