बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:24 PM2019-12-07T12:24:10+5:302019-12-07T12:24:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : बहुप्रतिक्षेतील बेडकी ते कोंडाईबारी महामार्ग रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मुहुर्त सापडला. नवापूर येथील रंगावली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : बहुप्रतिक्षेतील बेडकी ते कोंडाईबारी महामार्ग रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मुहुर्त सापडला. नवापूर येथील रंगावली पुलावरील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
धुळे-सुरत महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या दोन वषार्पासून रेंगाळले. त्यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली. परणामी जनक्षोभ वाढत गेल्याने रस्ता दुरुस्तीच्या मागणीने जोर धरला होता. २ डिसेंबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा विविध घटकाच्या माध्यमातून देण्यात आला. त्यात नवापबूर येथील वाहन चालक - मालक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी नवापूर तहसीलदार सुनिता जºहाड व पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्याकडे निवेदन देत दिला होता. जनतेचा हा जनक्षोभ लोकमतने वृत्त प्रसिध्द करीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्याची दखल घेत संबंधित विभागाकडून रस्ता दुरुस्ती लवकरच सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु उशिर होत असल्याने पुन्हा जनतेत नाराजीचा सूर उमटू लागला असतानाच कामाला सुरुवात करण्यात आली असून नवापूर येथील रंगावली नदीवरील पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांमध्ये समाधान वातावरण निर्माण झाले आहेत. परंतु या कामात सातत्य ठेवून काम पूर्ण करण्याची अपेक्षाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.