बिअरची विक्री 25 टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:40 AM2017-10-02T11:40:33+5:302017-10-02T11:40:33+5:30

विदेशी मात्र दणकेबाज : 500 मिटर कायद्याचा बसला होता फटका

Beer sales declined by 25 percent | बिअरची विक्री 25 टक्क्यांनी घटली

बिअरची विक्री 25 टक्क्यांनी घटली

Next
ठळक मुद्देदुकानांचा लिलाव स्थगित शासनाच्या धोरणाप्रमाणे एक हजार झाडांमागे एक ताडी दुकान असे सूत्र आहे. परंतु जिल्ह्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झाडे नसतांनाही दरवर्षी उत्पादन शुल्क विभागातर्फे ताडी दुकानांचे लिलाव करण्यात येतात. यंदा देखील तीन दुकानांचा लिलाव करण्याच

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांपूर्वी महामार्गाच्या 500 मिटर आत मद्य विक्रीची दुकाने आणि बिअरबार बंद करण्यात आल्यानंतर देशी मद्य, बिअर व वाईनच्या विक्रीत कमालीची घट आढळून आली. परंतु विदेशी मद्याच्या विक्रीत मात्र वाढ झाल्याचे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी हा आदेश काढल्यानंतर जिल्ह्यातील 85 दुकाने व बार बंद करण्यात आले होते. असे असले यापैकी अनेक ठिकाणी सर्रास मद्य विक्री होत असल्याची ओरड होत होती. परंतु या काळात उत्पादन शुल्क विभागाने एकाही ठिकाणी कारवाई केली नाही. परंतु असे असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत या काळात मद्य विक्री मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याचे एकुण आकडेवारीवरून दिसून येते. ऑगस्टअखेर देशी मद्याची विक्री नऊ लाख 38 हजार 672 बल्क लिटर इतकी झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी झाले आहे. विदेशी मद्याची विक्री पाच लाख 42 हजार 547 बल्क लिटर झाली. विदेशी मद्य मात्र 10.2 टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले. बिअरची विक्री 13 लाख 72 हजार 972 बल्क लिटर करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 26.5 टक्क्यांनी कमी झाल्याचे    सांगण्यात आले. वाईनची विक्री जिल्ह्यात फारशी नसली तरी या काळात चार हजार 931 बल्क लिटर वाईनची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ते प्रमाण 45.8 टक्के इतकी कमी झाली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या दाव्यानुसार या काळात एकुण 247 कारवाया करण्यात आल्या. अर्थात बंद करण्यात आलेल्या 85 दुकानांमध्ये ही कारवाई झालेली नाही. 247 कारवायांमध्ये 72 जणांना अटक करण्यात आली तर  32 लाख 62 हजार 362 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात   आला.

Web Title: Beer sales declined by 25 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.