तळोद्यातील कालिका मातेच्या यात्रोत्सवाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:58 PM2018-04-19T12:58:42+5:302018-04-19T12:58:42+5:30
भाविकांमध्ये उत्साह : तळोद्यात विविध धार्मिक उपक्रम
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 19 : शहराचे ग्रामदैवत कालिका मातेच्या यात्रेला अक्षय तृतीयेपासून सुरुवात झाली असून शहरासह तालुक्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी हजेरी लावत आहेत़ गणेश सोशल ग्रुपच्या वतीने यंदाही महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री पद्माकर वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
तळोदा शहराच्या वेशीवर असलेल्या कालिका मातेचा दरवर्षी अक्षयतृतीयेपासून यात्रोत्सव होतो. या यात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविक येऊन नवस फेडतात. या यात्रोत्सवाला बुधवारी मोठय़ा उत्साहात सुरूवात करण्यात आली़ महाआरती प्रसंगी उपस्थित असलेले माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी शहरात शांतता नांदावी अशी प्रार्थना केली़ यावेळी अॅड वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते हरिश्चंद्र जोशी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पद्धतीने महाआरती करण्यात आली. यावेळी माजी सभापती धनसिंग ठाकरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, न.पा.प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सुभाष चौधरी, सतीवन पाडवी, जितेंद्र माळी, योगेश मराठे, संदिप परदेशी, माजी नगरसेवक पंकज राणे, विकास राणे, योगेश पाडवी, गोविंद पाडवी, राहुल पाडवी, विकास पाटील, गोरख पाटील उपस्थित होत़े
यात्रोत्सवात येणा:या भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़