नंदुरबार जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:01 PM2017-10-26T13:01:36+5:302017-10-26T13:01:41+5:30
हमी भावाची अपेक्षा : नंदुरबार तालुक्यात पळाशी येथे चार हजार 700 रूपये दर
नंदुरबार : जिल्ह्यात खाजगी व्यापारी आणि बाजार समित्यांकडून नियुक्त केलेल्या परवानाधारकांनी कापूस खरेदी सुरू केली आह़े त्यांच्याकडून शेतक:यांच्या कापसाला क्विंटलमागे चार हजार 600 रूपये दर मिळत असला तरी या दरांमध्ये वाढ करण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े
जिल्ह्यात यंदा 88 हजार 238 हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ सर्वसाधारण क्षेत्रात 100 टक्के लागवड झालेल्या कापसाला काही ठिकाणी चुहापाणी करत शेतक:यांनी कापूस जगवला होता़ या कापसाला यंदा पाच हजार 700 रूपये क्विंटल दर मिळण्याची शेतक:यांची अपेक्षा होती़ मात्र बाजार समित्यांनी या कापसाला चार हजार 351 ते चार हजार 600 एवढाच दर दिला आह़े हा दर कमी असल्याने खरेदी केंद्राकडे शेतक:यांनी पहिल्याच दिवशी पाठ दाखवल्याचे दिसून आले आह़े दिवसभरात केवळ 250 क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती आह़े नंदुरबार बाजार समितीच्या घुली ता़ नंदुरबार येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात बुधवारी बाजार समितीचे सभापती भरत पाटील यांच्याहस्ते सकाळी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दत्तू चौरे, शेतकरी संघाचे अध्यक्ष बी़क़ेपाटील, उपसभापती लिलाबाई गिरासे, संचालक किशोर पाटील, अनिल गिरासे, सुरेश शिंत्रे, सचिव योगेश अमृतकर, युवराज पाटील, जितेंद्र पाटील, प्रकाश अग्रवाल, शिरीष अग्रवाल, अशोक चौधरी, अतुल भदाणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होत़े