आधारभूत केंद्रांतर्गत तूर खरेदीला सुरुवात

By admin | Published: January 18, 2017 11:36 PM2017-01-18T23:36:15+5:302017-01-18T23:36:15+5:30

शेतक:यांची सोय : 5050 हमी भाव जाहीर

The beginning of the purchase of ture under the basic center | आधारभूत केंद्रांतर्गत तूर खरेदीला सुरुवात

आधारभूत केंद्रांतर्गत तूर खरेदीला सुरुवात

Next


नंदुरबार : किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत येथील बाजार समिती आवारात तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. पाच हजार 50 रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला.
गेल्या तीन ते चार वर्षापासून तूर आणि तूरडाळींचे भाव गगणाला भिडले होते. सर्वसामान्यांच्या जेवनातून काही दिवस तूरडाळच हद्दपार झाली होती. यावर्षी तूर पिकाचे चांगले उत्पादन आले आहे. त्यामुळे शासनाने खरेदी केंद्र सुरू केले आहे. खरीप हंगामात केंद्र शासनाच्या भाव स्थिरता निधी योजनेंतर्गत खुल्या बाजारभावाने तसेच किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. बाजार समिती आवारात हे केंद्र राहणार आहे. एफएकक्यू प्रतिची तूर किमान आधारभूत रक्कम पाच हजार 50 रुपये हमी दराने खरेदी नाफेडच्यावतीने करण्यात येणार आहे. शेतक:यांनी तूर खरेदी केंद्रावर विक्रीस आणताना सोबत सातबारा उतारा व बँक खाते पासबुकची मूळ प्रत सोबत आणावी. फक्त एफएक्यू प्रतिची तूरच खरेदी केली जाणार असेही नाफेडतर्फे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: The beginning of the purchase of ture under the basic center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.