शहाद्यात व्यवहारांचा चक्का जाम
By Admin | Published: June 2, 2017 01:32 PM2017-06-02T13:32:31+5:302017-06-02T13:32:31+5:30
शहादा बाजार समितीत शेतक:यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबला आहे
>ऑनलाईन लोकमत
शहादा,दि.2- शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार संपाच्या पहिल्याच दिवशी एक टक्काही होऊ शकले नाहीत़ शहादा बाजार समितीत शेतक:यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबला असून यामुळे आर्थिक घडी विस्कटली आह़े
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवशी 30 लाख रूपयांचे धान्य आणि भाजीपाला यांची आवक होत़े बाजार समितीत बंदच्या पहिल्याच दिवशी व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होत़े भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद झाल्याने व्यवहार किरकोळ स्वरूपात झाल़े तर धान्य खरेदी-विक्रीतून तुरळक 25 हजार रूपयांची उलाढाल झाली होती़ शहादा बाजार समितीत दरदिवशी 100 ट्रॅक्टर भाजीपाला आणि इतर भुसार मालाची आवक होत होती़
दर दिवशी 700 क्विंटल भुसार आणि भाजीपाला यांची आवक होत असलेल्या या बाजारात गुरूवारी कुणीही नव्हत़े शहादा बाजार समितीत धान्य मालाची खरेदी करणा:या व्यापा:यांकडे गुरूवारी सकाळपासून तुरळक हरभरा, दादार आणि गव्हाची आवक झाल्याचे दिसून आल़े
धान्य बाजारातील संपाच्या स्थितीमुळे मालाची वाहतूक करणारे अवजड वाहनचालक, हमाल, मापाडी यांच्या रोजगारावर परिणाम झाला होता़