केलवापाणी गावातील लाभार्थी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:34+5:302021-09-25T04:32:34+5:30

सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या केलवापाणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. केलवापाणी गावात गर्भवती माता व ...

Beneficiaries of Kelvapani village are deprived of nutritious food | केलवापाणी गावातील लाभार्थी पोषण आहारापासून वंचित

केलवापाणी गावातील लाभार्थी पोषण आहारापासून वंचित

googlenewsNext

सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या केलवापाणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. केलवापाणी गावात गर्भवती माता व बालक लाभार्थी आहेत. त्यांना पोषण आहार देय असतानाही, तो वाटप केला जात नाही. यातून गर्भवती मातांचे आरोग्य धोक्यात आले असून कुपोषित बालकांच्या संपूर्ण पोषणावरही गदा येणार आहे. महिला व बालकांसाठी नियमित पोषण आहार वितरित केला जात असल्याच्या नोंदी असताना, पोषण आहार न मिळण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. प्रशासनाने याकडे योग्य लक्ष देऊन चाैकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर गोण्या जोग्या पाडवी, मोता काकड्या पाडवी, राष्या उताऱ्या पाडवी, आमश्या रेजल्या पाडवी, कुवरसिंग सोमजी पाडवी, फुलसिंग आमश्या पाडवी, कालुसिंग ओल्या नाईक, गोण्या उमऱ्या पाडवी, जयसिंग काकड्या पाडवी, वल्या उतऱ्या पाडवी, आमश्या गिल्या पाडवी, शांताराम कालुसिंग पाडवी, नीलेश पाडवी, सनू वसावे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Web Title: Beneficiaries of Kelvapani village are deprived of nutritious food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.