लंगडीभवानी येथील लाभार्थीने लावली ग्रामसेवकाच्या कानशिलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:09 PM2018-08-17T12:09:06+5:302018-08-17T12:09:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरकुलांच्या पैशांच्या वादातून ग्रामसेवकास एकाने कानशिलात लगावल्याची घटना लंगडीभवानी, ता.शहादा येथे घडली. शहादा पोलिसात एकाविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लंगडीभवानीचे ग्रामसेवक विरसिंग मनोहर पावरा हे ग्रामपंचायत कार्यालयात थांबले होते. त्या ठिकाणी गावातीलच सत्तरा शिका:या पावरा हे आले, त्यांच्या घरकुलाचा हप्ता बाकी होता. तो मिळावा म्हणून त्यांनी गेल्या ंनेक दिवसांपासून ग्रामसेवक पावरा यांच्या मागे तगादा लावला होता. परंतु घरकुलाचा हप्ता मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी ग्रामसेवकाला याबाबत विचारले असता त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली.
सत्तरा पावरा यांनी थेट ग्रामसेवकाच्या कानशिलात लगावली. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली. काहींनी मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रय} केला.
याबाबत विरसिंग मनोहर पावरा यांनी फिर्याद दिल्याने सत्तरा पावरा यांच्याविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार शिंदे करीत आहे.