सुपारी घेवून भिंत पाडण्याचा प्रय}

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:09 PM2019-08-25T12:09:37+5:302019-08-25T12:09:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खाजगी कॉम्पलेक्ससाठी बसस्थानकाची भिंत पाडण्याच्या प्रकारातून कथीत खासदार महिला आणि तिच्या साथीदारांकडे दोन पिस्तुल, ...

Betel nut | सुपारी घेवून भिंत पाडण्याचा प्रय}

सुपारी घेवून भिंत पाडण्याचा प्रय}

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खाजगी कॉम्पलेक्ससाठी बसस्थानकाची भिंत पाडण्याच्या प्रकारातून कथीत खासदार महिला आणि तिच्या साथीदारांकडे दोन पिस्तुल, एक मॅगेङिान आणि 25 जिवंत काडतूस सापडल्याची खळबळजनक घटना नंदुरबारात शनिवारी पहाटे घडली. दरम्यान, 20 लाखांच्या बदल्यात रमेश चौधरी यांनी हे काम दिल्याची कबुली महिलेने दिली आहे. नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
रमेश बाबुलाल चौधरी, रा.नंदुरबार, बबीता वर्मा, रा.अंधेरी, मुंबई, विजय किसन देवरे, रा.खोरदड, ता.धुळे, अजित चंद्रकांत देसले, रा.वलवाडी, ता.धुळे, वाल्मिक श्रीधर दराडे, रा.नाशिक यांच्यासह भिंत पाडण्याचे काम करणारे जंगलू पाडवी, प्रकाश पाडवी, दादू भिल, जयू भिल, रवींद्र पाडवी सर्व रा.नळवा, ता.नंदुरबार अशी संशयीतांची नावे आहेत. रमेश चौधरी फरार असून इतर सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदुरबार बसस्थानकाला लागून साईप्लाझा कॉम्पलेक्स आहे. राज्य परिवहन विभाग आणि या कॉम्पलेक्सचे मालक यांच्यात वाद आहे. परिवहन विभाग भिंत तोडण्यास मनाई करीत आहे. यावरून न्यायालयीन वादही झाले आहेत. यातूनच तथाकथीत महिला आणि तिच्या साथीदारांनी शनिवारी पहाटे भिंत तोडण्याचा प्रकार केला. ही बाब आगाराचे प्रमुख मनोज पवार यांना दिसली. त्यांनी संबधीतांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. महिलेने आपण खासदार असून इतरांनी पोलीस व अंगरक्षक असल्याची बतावणी केली. पवार यांनी वरिष्ठांना ही बाब सांगितली. पवार यांनी पोलिसांना पाचारण केले. 
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संबधीतांना विचारणा केली. पोलिसांशीही त्यांनी हुज्जत घातली. सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले असता त्यांच्याकडे दोन पिस्तूल, नऊ मॅगेङिान, 25 काडतूस जप्त करण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी साई प्लाझाचे मालक रमेश चौधरी यांनी 20 लाख रुपये देवून हे काम सोपविल्याचे सांगितले. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसात रमेश चौधरी यांच्यासह कथीत महिलेसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तथाकथीत महिला कोण, तिचे साथीदार कोण, नंदुरबारात येवून अनधिकृतरित्या भिंत पाडण्याचे कारण काय? यासह इतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. ही कारवाई फौजदार चौधरी, सोनवणे, हवालदार अरुण सैंदाणे, रवींद्र पवार, अमोल पवार, सुनील येलवे, रामेश्वर चव्हाण, अनील बडे, उत्तम अहिरे, रोहिणी धनगर, इंदिरा वळवी यांनी केली. तपास पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर करीत आहे.      
 

Web Title: Betel nut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.