भादवड येथे किरकोळ वादातून तिघा महिलांसह एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:00 PM2018-03-05T13:00:06+5:302018-03-05T13:00:06+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : भादवड ता़ नवापूर येथे किरकोळ कारणातून दोन कुटूंबांमध्ये वाद झाला़ यातून तिघा महिलांसह कुटूंब प्रमुखाला बेदम मारहाण करण्यात आली़ शनिवारी सकाळी 9़30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़
रूपसिंग महादू वळवी (47) यांच्या घरासमोर शनिवारी दिपमाला संदीप गावीत यांनी कचरा टाकला होता़ याबाबत रूपसिंग वळवी यांच्या पत्नी यमुनाबाई यांनी विचारणा केली़ यातून दिपमाला गावीत, संदीप गावीत, शिवमंगल चिंतामण गावीत, हुपा बिज्या नाईक, सुशिला चिंतामण नाईक सर्व रा़भादवड यांनी वळवी कुटूंबियांसोबत वाद घातला, वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल़े दरम्यान रूपसिंग वळवी, यमुनाबाई वळवी, अंजली रूपसिंग वळवी, अंबिका रूपसिंग वळवी यांच्यावर लाकडी डेंगारा, किकेट्रचे स्टंप, लाठय़ा काठय़ा याद्वारे संदीप , शिवमंगल व हुपा गावीत यांनी मारहाण केली़ जखमी झालेल्या वळवी कुटूंबियांना खांडबारा व विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े
घटनेनंतर रात्री उशिरा रूपसिंग वळवी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीसांनी शनिवारी रात्री 10़24 वाजेच्या सुमारास संदीप गावीत व शिवमंगल गावीत यांना अटक केली होती़