कोठार आश्रमशाळेत गणेशोत्सवानिमित्त भजन संध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:33 AM2021-09-18T04:33:14+5:302021-09-18T04:33:14+5:30
यावेळी शरद पवार यांचे माजी स्वीय सहायक चंद्रकांत खरे, नम्रता खरे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा श्री साईनाथ ...
यावेळी शरद पवार यांचे माजी स्वीय सहायक चंद्रकांत खरे, नम्रता खरे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी, भाजप ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वनाथ कलाल, विलास डामरे, आनंद सोनार, संस्थेच्या संचालिका सुनीता वाणी, आदित्य मालपुरे, सायली मालपुरे, संजय वाणी, आदी उपस्थित होते.
सालाबादप्रमाणे आश्रमशाळेत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ‘भजनसंध्या’ कार्यक्रम पार पडला. डॉ. शशिकांत वाणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत खैरे यांनी कोठार आश्रमशाळा झालेला संख्यात्मक व गुणात्मक विकासाबाबत समाधान व्यक्त केले.
भजन संस्थेच्या कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते, प्रमुख पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी भजनसंध्येच्या कार्यक्रमात तल्लीन झालेले दिसून आले.
साईप्रसाद भजन मंडळाचे राजेंद्र वायकर, गुलाबराव चव्हाण, जगन मराठे, कैलास लोहार, सचिन पाटील, शंकर मुठाळ, सी. एम. पाटील, हेमराज माळी, ईश्वर पाटील, शांतीलाल भापकर, नरोत्तम मराठे, आदींनी भजन व भक्तिगीतांचे सादरीकरण केले.
यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, भूषण येवले, संदीप पाठक, पन्नालाल पावरा, जयवंत मराठे, निंबा रावळे, योगेश चव्हाण, हरी भारती, मनोज चिंचोले यांनी परिश्रम घेतले. हंसराज महाले यांनी सूत्रसंचालन केले.