मांडवा आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:38+5:302021-01-18T04:28:38+5:30
कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती निर्मलाबाई राऊत, ...
कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती निर्मलाबाई राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, उपसभापती विजय पाडवी, जि.प. सदस्य बाजूबाई वसावे, सरपंच ममताबाई पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील मासखेडे आदी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री ॲड.पाडवी म्हणाले की, दुर्गम भागातील आदिवासी जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात येतील. त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल. या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे परिसरातील जनतेला चांगले उपचार मिळू शकतील. आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनेअंतर्गत या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार करण्यात येत असून त्यावर पाच कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पॅथोलॉजी लॅब, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया कक्ष, शवविच्छेदन गृह, औषध भांडार आदी सुविधा येथे असतील.