दुचाकीचा आरसा हा केवळ केस विंचरण्यापुरता आणि फॅशनसाठीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:03 PM2020-12-26T12:03:49+5:302020-12-26T12:04:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन बाजुंना दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमांच्या दृष्टीकोणातून लावले  जातात. ...

The bike mirror is just for haircuts and for fashion! | दुचाकीचा आरसा हा केवळ केस विंचरण्यापुरता आणि फॅशनसाठीच!

दुचाकीचा आरसा हा केवळ केस विंचरण्यापुरता आणि फॅशनसाठीच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन बाजुंना दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमांच्या दृष्टीकोणातून लावले  जातात. शिवाय चालकाला मागून कोणते वाहन येत आहे हे पहाण्यासाठी देखील आवश्यक असतो. परंतु या आरशांचा उपयोग केवळ १० ते १५ टक्केच केला जात असल्याचा अंदाज आहे. 
                 आरसे दुचाकीचे शो वाढविण्यासाठी किंवा केस विंचरण्यासाठीच होतो की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. स्पोर्ट बाईक आणि जास्त सीसीच्या वाहनांचे तर आरसे काढून त्या ठिकाणी शोचे वस्तू लावले जातात. वास्तविक साईड ग्लास अर्थात दोन्ही बाजुंच्या आरसे नसल्यास वाहतूक पोलिसांना दंड अकारण्याची देखील मुभा आहे. त्यासाठी किमान २००रुपये दंड आकारला जातो. साईड ग्लास राहिल्यास चालकाला मागे वळून पहाण्याची गरज नसते. हेल्मेट घातले असल्यास मागे वळून पहाण्यासाठी त्रासदायक ठरते. अशा वेळी जर साईडग्लास राहिल्यास मागील येणारे वाहन त्यातून सहज दिसून जाते. शिवाय टर्न घेतांनाही हे ग्लास फार उपयोगी पडतात. 
                 दुचाकी चालकांवर गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेल्या आहेत. त्यात लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे, साईड ग्लास नसणे, आरसीबूक व विमा नसणे अशा प्रकारच्या आणि तीन सीटच्या कारवाया झालेल्या आहेत. 
बुलेटचा आवाज कमी होणार
                बुलेटचे ओरिजन सायलेंसर काढून नवीन सायलेंसर अर्थात मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसविण्याची फॅशन आहे. याद्वारे ध्वनी व वायू प्रदूषण देखील होते. ओरिजनल कंपनीच्या सायलेंसरमध्ये फिल्टर आणि इतर आवश्यक उपकरणे असतात. त्याद्वारे ते आवाज कमी आणि वायू प्रदूषण देखील कमी करते. नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे यांनी याबाबत कारवाई सुरू केल्या आहेत. दहा बुलेटस्वारांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आल्याने अनेकांनी ओरिजनल सायलेंसर बसवून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.  याबाबत सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही शहर वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली.

शहरातील दुचाक ५०,०००

आरसा नाही म्हणून २०० रु. दंड
              दुचाकीला आरसा नसल्यास वाहतूक पोलीस २०० रुपयांचा दंड आकारू शकतात. किमान एक साईड ग्लास दुचाकीला असणे आवश्यक आहे. दोन्ही असल्यास चांगले. शिवाय फॅशनेबल ग्लास देखील लावता येऊ शकत नाहीत.  

दुचाकीचालकांजवळ हे असणे बंधनकारक
              दुचाकी चालकांकडे हेल्मेट आणि लायसन्स असणे सक्तीचे आहे. याशिवाय साईड ग्लास, आरसी बूक, इन्सूरन्स कागदपत्रे आवश्यक आहे. योग्य नंबर प्लेट असणे देखील बंधनकारक आहेत. 

दुचाकी चालकांजवळ हेल्मेट आणि लायसन्स आवश्यक आहे. साईड ग्लास, नियमानुसार नंबरप्लेट, आरसीबूक आणि इन्सूरन्स पाहिजे. या सर्व बाबींसाठी वेगवेगळे दंड आहेत. साईड ग्लासचा उपयोग फॅशनसाठी होऊ नये. नंदुरबारात सद्या बुलेट वाहनांवर कारवाई सुरू आहे. ओरिजनल सायलेंसर नसल्यास दंड आकारणार आहोत.
-अविनाश मोरे, पोलीस निरिक्षक, शहर वाहतूक शाखा, नंदुरबार.

Web Title: The bike mirror is just for haircuts and for fashion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.