कंजालाच्या रुषाबाई वळवी यांना बाया कव्रे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:28 PM2019-12-01T12:28:24+5:302019-12-01T12:28:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात वनवासी महिलांच्या उत्कर्षासाठी कार्यरत रूषाबाई रामसिंग वळवी यांना यावर्षाचा ‘बाया कर्वे’ ...

Biya Kavre Award to Rushabai Varavi of Kanjala | कंजालाच्या रुषाबाई वळवी यांना बाया कव्रे पुरस्कार

कंजालाच्या रुषाबाई वळवी यांना बाया कव्रे पुरस्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात वनवासी महिलांच्या उत्कर्षासाठी कार्यरत रूषाबाई रामसिंग वळवी यांना यावर्षाचा ‘बाया कर्वे’ पुरस्कार घोषीत झाला आहे. पुणाच्या प्रतिष्ठित महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमार्फत हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
सातपुडय़ातील दुर्गम डोंगररांगात गेल्या  25 वर्षापासून रूषाबाई कार्यरत आहेत. कठीण परिस्थिती म्हणजे काय तर त्यांच्या गावाचा रस्ता दोन वर्षापुर्वी व वीज गेल्या वर्षी आली आहे. स्वत:पासून बदलाला सुरूवात करत त्यांनी स्थानिक महिलांना प्रेरणा दिली. स्वत: 11 वी शिकल्या, अंगणवाडीच्या माध्यमातून गावात शिक्षणाचा प्रसार केला. महिला बचत गटांमधून महिलाचं संघटन बांधल. आज 300 हून अधिक वनवासी महिला यातून बचत व रोजगार मिळवीत आहेत. महिलांचे जैवविविधता विषयक ज्ञान कुपोषण दूर करण्यासाठी उपयुक्त असतं. 
रुषाबाईंनी स्थानिक वन भाज्यांची नोंद व वनभाजी उत्सवात भाग घेण्यासाठी प्रेरणा दिली. यातून कंजाला परिसरातील वनभाज्या हे पहिले जैवविविधता व्यवस्थापन समितींनी तयार केलेले पुस्तक थेट राजभवनात प्रकाशित झाले. या सगळ्या प्रवासात त्यांना पती रामसिंग वळवी व परिवाराची खंबीर साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या पुरस्काराने गौरव झाल्याने या क्षेत्रात काम करणा:या विविध संस्थांतर्फे त्यांचे कौतूक करण्यात आले. 
 

Web Title: Biya Kavre Award to Rushabai Varavi of Kanjala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.