भाजपची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:11 PM2019-06-30T12:11:30+5:302019-06-30T12:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी निवडणुका लक्षात घेता सक्षम पदाधिकारी नियुक्तीसाठी भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी निवडणुका लक्षात घेता सक्षम पदाधिकारी नियुक्तीसाठी भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जिल्हा कार्यकारीणी बरखास्त केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर शक्तीकेंद्र प्रुमख, बुथप्रमुख, पेजप्रमुख यांचे संघटन मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी सांगितले. लवकरच नवीन मतदार, नवीन सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. विधानसभानिहाय कार्यक्रमही घेण्यात येणार असून त्यासाठी नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
नवीन कार्यकारिणी निवडतांना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.
जिल्ह्यात पक्ष कार्याला जोमाने सुरूवात करण्यासाठी लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे विजय चौधरी यांनी दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.