नंदुरबार पालिकेत 200 कोटींचा भ्रष्टाचाराचा भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 04:52 PM2018-06-18T16:52:26+5:302018-06-18T16:52:26+5:30

BJP's allegations of corruption of 200 crore in Nandurbar Municipal Corporation | नंदुरबार पालिकेत 200 कोटींचा भ्रष्टाचाराचा भाजपचा आरोप

नंदुरबार पालिकेत 200 कोटींचा भ्रष्टाचाराचा भाजपचा आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार पालिकेत विविध विकास योजनांमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपतर्फे पुन्हा करण्यात आला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने जिल्हाधिका:यांकडे विचारणा केली. जिल्हाधिका:यांनी उपजिल्हाधिकारी, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संयुक्तरित्या चौकशीचे आदेश देवून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्षा तथा खासदार डॉ.हिना गावीत, पालिकेतील भाजपचे गटनेते चारूदत्त कळवणकर, डॉ.रवींद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष मोहन खानवाणी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना पदाधिका:यांनी सांगितले, पालिकेने राबविलेल्या भुमीगत गटार, वाढीव पाणी पुरवठा, रस्ते प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पालिका मालकीच्या वास्तू कराराने देणे, विद्युत विभाग, बांधकाम निविदा, विकास आराखडा आदींमध्ये किमान 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत लेखा परिक्षण अहवालात देखील गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका:यांना याबाबत चौकशीच्या सुचना दिल्या होत्या. जिल्हाधिका:यांनी उपजिल्हाधिकारी, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संयुक्तरित्या चौकशीचे आदेश देवून तातडीने आवश्यक त्या पुराव्यानीशी आणि कागदपत्रांनीशी अहवाल सादर करण्याच्या सुचना दिलेल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: BJP's allegations of corruption of 200 crore in Nandurbar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.