विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या कडवानजवळील ‘ब्लॅक स्पॉट’ अपघातीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:56 PM2017-11-12T12:56:53+5:302017-11-12T12:56:53+5:30

खडीचा त्रास : निधीचे अंदाजपत्रक मंजूर

The 'Black spot' near the Kadwan between the Yagwada and Nandurbar was accidental | विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या कडवानजवळील ‘ब्लॅक स्पॉट’ अपघातीच

विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या कडवानजवळील ‘ब्लॅक स्पॉट’ अपघातीच

Next
ठळक मुद्देआठ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित विसरवाडी ते नंदुरबार दरम्यानच्या राज्यमार्ग क्रमांक पाचवरील कडवान गावाजवळ 550 मीटरचा रस्ता हा अपघाती ठरल्याचे तीन वर्षातील 10 गंभीर अपघात आणि त्यात दगावलेल्या पाच व्यक्तींवरून हे निश्चित करण्यात आले होत़े याठिकाणी समोरून य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विसरवाडी ते नंदुरबार या दरम्यान कडवान ता़ नवापूर गावाजवळ सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे हे स्थळ ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित झाले आह़े सप्टेंबर महिन्यात याठिकाणी सव्रेक्षण झाले होत़े त्यानंतर उपाययोजनांसाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात कामकाज सुरू झालेले नाही़ 
नंदुरबार जिल्ह्यात वावद आणि कडवान ही दोन ठिकाणी ब्लॅक स्पॉट ्म्हणून प्रशासनाने निर्धारित केली आहेत़ या निश्चितीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सात ऑक्टोबर रोजी धुळे येथील अधिक्षक अभियंता यांच्याकडे 86 लाख 15 हजार रूपये खर्चाचे उपाययोजनांचे  अंदाजपत्रक दिले होत़े त्यावर  येत्या 10 दिवसात  कारवाई होण्याचे संकेत होत़े मात्र  गेल्या एक महिन्यात बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्याने कडवान येथे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत़ याठिकाणी तीन ठिकाणी तिव्र चढ-उतार आहेत़ समोरून येणा:या वाहनाची चाहूलही लागत नसल्याने अपघातांची दाट शक्यता असत़े यातच येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी अपघातांमध्ये भर घालण्याचे काम करत आह़े विशेष म्हणजे रात्री वेळी वाहनाधारकांना समजून येईल असे, कोणत्याही प्रकारचे फलक संबधित विभागाने याठिकाणी लावलेले नाहीत़ यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आह़े 
 

Web Title: The 'Black spot' near the Kadwan between the Yagwada and Nandurbar was accidental

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.