एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडय़ा
By admin | Published: January 18, 2017 11:52 PM2017-01-18T23:52:15+5:302017-01-18T23:52:15+5:30
पिंगाणेसह परिसरातील प्रकार : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
शहादा : शहादा तालुक्यातील पिंगाणे, धुरखेडा व भादा गावातील सात ते आठ घरांचे कुलूप तोडून चोरांनी धाडसी चोरी करण्याचा प्रय} केला आहे. यात पिंगाणे गावातील दोन घरांमधून दोन लाख रुपयांची रोकड व ऐवज लंपास केला तर भादा येथील चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली शेतात सापडल्या आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन ते चार दरम्यान घडली आहे. ग्रामीण भागात झालेल्या या घटनांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरी भागात घरी कोणी नाही म्हणून नवीन वसाहतीत घरफोडी नित्याचे झाले आहे. मात्र चोरांना आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. सध्या विवाह मुहूर्तामुळे अनेक घरमालक परिवारासह घराला कुलूप लावून बाहेर गावी जात आहे. याच संधीचे सोने करण्याचा प्रय} चोरटय़ांनी केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील पिंगाणे येथील संजय लक्ष्मण पाटील व काशीनाथ सुदाम पाटील हे परिवारासह लगAासाठी बाहेरगावी गेले होते. जाताना दोन्ही परिवारातील महिलांनी मौल्यवान वस्तू सोबत नेले होते. यात संजय लक्ष्मण पाटील हे प्रकाशा येथे नातेवाईकांकडे विवाह सोहळ्याकरिता गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत चार लोखंडी कपाट तोडून त्यातील कपडे, इतर साहित्य जमिनीवर व पलंगावर अस्तावेस्त फेकून तिजोरीतील साडेचार तोळ्याच्या सोन्याच्या बांगडय़ा, चेन व रोकड 28 हजार व देव्हा:यातील ड्रॉवरमध्ये रोख दोन हजार रुपये असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला आहे. याच दिवशी गावातील काशीनाथ सुदाम पाटील यांच्या घरात चोरी करण्याचा प्रय} केला मात्र तेथून खाली हात परतावे लागले आहे.
धुरखेडा गावातील खंडू शाम पाटील व उत्तम तुकाराम पाटील यांच्या घरासह भादा येथील रमाकांत श्रीपत पाटील यांच्या घराचे कुलूप तोडीत घरातील कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून रोकड व मौल्यवान वस्तू चोरण्याचा प्रय} केला. मात्र चोरटय़ांना तेथेही काहीच न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागते. याच घटनेप्रसंगी आंडरवेअर व बनियान घातलेल्या आरोपींनी भादा गावातील उद्धव मंगळू पाटील व भगवान सुदाम पाटील यांच्या मोटारसायकलीचा चोरीसाठी वापर केला होता. चोरांनी या तिन्ही गावात सात ते आठ चोरांच्या मदतीने चोरी करून या दोन्ही मोटारसायकली पिंगाणे गावालगतच्या भादा रस्त्यावरील शेतात सोडून पोबारा केला.
भादा व धुरखेडासह पिंगाणे गावात बुधवारी पहाटे एकाच वेळीस घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतरवियर व बनियान धारण केलेले चोर असल्याची बतावणी होत आहे. ज्या घरात घरफोडय़ा झाल्या त्या महिलांनी स्वत:चे सोने-चांदीचे मौल्यवान वस्तू सोबत नेल्याने होणा:या मोठी हानी टळली आहे. पिंगाणे गावात संजय पाटील यांच्या घरात चोरटे माल लंपास करीत होते. त्याच वेळीस त्यांच्या घरापासून 100 मीटरच्या आत विवाह सोहळ्याचा मंडप कर्मचारी थाटत होते. या वेळीस चोरीची घटना घडल्याचे समजते. चोरांनी ग्रामीण भागात घरफोडीचा घटनाक्रम सुरू केल्याने पोलिसांसमोर त्यांनी एकप्रकारे आवाहन उभे केले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी लतीफ तडवी, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंतसह पोलीस ताफा पोहोचला. यामुळे त्यांची चौकशी करून चोरटय़ांचा माग काढण्याचा प्रय} केला. (वार्ताहर)
पाच घरांमध्ये काहीच हाती आले नाही
चोरांनी हापपॅण्ट व बनियान परिधान केले होते
भादा येथील चोरीच्या मोटारसायकलींचा वापर
महिलांनी स्वत:चे सोने-चांदीचे दागिने सोबत नेल्याने दरोडय़ाचा डाव घसरला
पाच घरात चोरांना खाली हात परतावे लागले
ग्रामीण भागात पहिल्यांदाच एकाच वेळेस तीन गावात घरफोडीच्या घटनेने नागरिक भयभित