पुलाखाली केळीचे वाळलेले खांब टाकल्याने प्रवाहास अडथळा

By admin | Published: June 10, 2017 05:31 PM2017-06-10T17:31:47+5:302017-06-10T17:31:47+5:30

नाल्याला पूर आल्यास पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन पुलाची मोठय़ा प्रमाणात हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

Block the stream by placing a banana banana under the bridge | पुलाखाली केळीचे वाळलेले खांब टाकल्याने प्रवाहास अडथळा

पुलाखाली केळीचे वाळलेले खांब टाकल्याने प्रवाहास अडथळा

Next

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 10 -  तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावरील भवर नाल्यावरील पूल सध्या वाहतुकीसाठी धोकेदायक ठरत आह़े पुलाखाली असलेल्या नाल्यामध्ये केळीचे वाळलेले खांब टाकण्यात येत आह़े त्यामुळे नाल्याला पूर आल्यास पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन  पुलाची मोठय़ा प्रमाणात हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
तळोदा-अक्कलकुवा मार्गावरील खांडसरी परिसरात भवर नाला आह़े मुसळधार पाऊस झाल्यास नाल्याखालून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असतो़ मात्र सध्या पुलाच्या खाली मोठय़ा प्रमाणात कच:याचा तसेच केळीच्या खाबांचा ढिग साचलेला आह़े त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहास मोठय़ा प्रमाणात अडचणीचा ठरु शकतो़ पावसाळा सुरु असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी थेट पुलावरुन वाहून येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे यातून  पुल वाहुन गेल्यास मोठा अनर्थही होऊ शकतो़ प्रशासनाचे याकडे  दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े
वाहनधारकांना पुलावरुन वाहतुक करताना आपला जीव मुठीत घेऊन वावर करावा लागत आह़े गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आह़े त्यामुळे अशा पध्दतीने सतत पाऊस पडत राहिल्यास नाला दुथळी भरुन वाहत असतो़ त्यामुळे पूल धसण्याचे किंवा वाहून जाण्याचा प्रकारही घडू शकतो़ त्यामुळे याकडे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Block the stream by placing a banana banana under the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.