संत सेना प्रेरित व्यायाम शाळेतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:01+5:302021-09-22T04:34:01+5:30
शिबिराचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील उपस्थित होते. ...
शिबिराचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील उपस्थित होते. शिबिराप्रसंगी अर्जुन पटले यांनी सांगितले की, जीवनात विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे आहे. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतील. अध्यक्षस्थानी नगीन मगन सोनवणे तर मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक एकनाथ कथ्थू सोनवणे, दिलीप गोविंद साळुंखे, राजेंद्र मोहन नांदेडकर, अजय जगन्नाथ जाधव व तुकाराम इंदास सोनवणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे पुंजरू भिक्कन जाधव, यशवंत बाबूराव होळकर व छोटू नथ्थू जाधव व संत सेना व्यायाम शाळेचे नितीन अशोक होळकर उपस्थित होते.
या कार्यक्रमास राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. संगीता रवींद्र सूर्यवंशी व सचिव सीमाबाई मनोज होळकर उपस्थित हाेत्या. याप्रसंगी महिला मंडळाच्या शोभाताई किशोर होळकर यांनी रक्तदान केले. यासाठी संत सेना प्रेरित व्यायामशाळा व संत सेना युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या वेळी मान्यवरांनी सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल संत सेना व्यायामशाळेचे अध्यक्ष मुकेश चंद्रकांत होळकर, उपाध्यक्ष गिरीश सुदाम नांदेडकर, सचिव योगेश अशोक होळकर व खजिनदार दिनेश सुभाष सोनवणे यांचे कौतुक केले. कार्यक्रमास संत सेना युवा मंडळाचे अध्यक्ष संतोष विठ्ठल नांदेडकर व शहीद वीरभाई कोतवाल सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण अशोक नांदेडकर आणि समस्त गुजर नाभिक समाज नंदुरबार विभागीय पंच रामकृष्ण पुरुषोत्तम नांदेडकर, राकेश जीवन सोलंकी हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन घनश्याम दगूलाल नांदेडकर तर, आभार संत सेना प्रेरित व्यायाम शाळेचे संचालक अजितेम भरत सोनवणे यांनी मानले.