‘लोकमत रक्ताचं नात’ अभियानांतर्गत शहाद्यात आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:19+5:302021-07-18T04:22:19+5:30
लोकमत परिवार व व्हीएसजीजीएम, संकल्प ग्रुप, जायंट्स ग्रुप, जैन युवाशक्ती, शहादा व्यापारी महासंघ, शहादा, ता.केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, भारतीय ...
लोकमत परिवार व व्हीएसजीजीएम, संकल्प ग्रुप, जायंट्स ग्रुप, जैन युवाशक्ती, शहादा व्यापारी महासंघ, शहादा, ता.केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, भारतीय जैन संघटना, प्रार्थना फाउंडेशन, इन्कलाब ब्रिगेड, समर्पण ग्रुप, जायंट्स सहेली ग्रुप, श्री छत्रपती रक्त फाउंडेशन, कन्या जन्म ब्लडग्रुप, रोटरॅक्ट क्लब शहादा, रोटरी क्लब शहादा, तापी व्हॅली, जय सरदार पटेल फाउंडेशन, जय बजरंग ग्रुप, सकल मराठा समाज, क्रीडा शिक्षक संघटना शहादा तालुका, दाऊदी बोहरा समाज ग्रुप या संस्थांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत १८ जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून रक्तदान होत नसल्याने राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जूनपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून थांबलेल्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. राज्यभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. हीच रक्ताची गरज लक्षात घेऊन लोकमत समूहाने २ जुलैपासून ‘रक्ताचं नातं’ हे महारक्तदान अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी ५ वाजेपावेतो होणाऱ्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून रुग्णांना जीवन दान द्यावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराकडून करण्यात येत आहे.