नंदुरबारातही बोगस दारूचा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:13 PM2020-04-16T12:13:45+5:302020-04-16T12:13:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात नंदुरबारात बोगस दारूचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी वेळोवेळच्या कारवाईत ते उघड झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात नंदुरबारात बोगस दारूचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी वेळोवेळच्या कारवाईत ते उघड झाले आहे. तळीरामांची वाढती मागणी लक्षात घेता नंदुरबारात एकाने बोगस दारू निर्मितीला सुरुवात केली. पोलिसांच्या धाडीत कारखाना उध्वस्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पंकज नामदेव चौधरी, रा.साक्रीनाका, नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार फरार आहेत.
लॉकडाऊनमुळे तळीरामांची पंचायत झाली आहे. वाटेल तेथून दारू मिळविण्यासाठी तळीराम प्रयत्नशील आहेत. हीच संधी साधत बोगस दारू बनविणे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या माध्यमातून होणारी हजारो रुपयांची कमाई लक्षात घेता नंदुरबारात देखील बोगस दारू बनविणारे सक्रीय झाले आहेत. पैकी एक कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील दसेरा मैदान परिसरातील एका गोडावूनमध्ये बोगस दारू तयार केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. शहर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी अचानक धाड टाकली असता त्यात तब्बल ९५ हजार ३२० रुपयांचे बोगस दारू तयार करण्याचे साहित्य मिळाले. त्यात २३० लिटर स्पिरीट, १६ ट्रम, १०५ मॅकडोल दारूच्या बाटल्या, २ इर्न्व्टर, बूच पॅक करण्याचे मशीन, २५ ट्रे, ५०० खाली बाटल्या, एक हजार बूच व इतर साहित्य यांचा समावेश आहे. याच ठिकाणी पाच लाखाची कार देखील मिळून आली ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत फौजदार प्रवीण पाटील यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बिºहाडे करीत आहे.
दरम्यान, दारूचा कारखाना चालविणाºया पंकज चौधरी याला आणखी कुणाची साथ आहे. कुणाच्या आशिर्वादाने तो हे काम करीत होता. फरार झालेले त्याचे साथीदार आणखी कोण? याची कसून चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.