बोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदत न मिळाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:32 PM2018-03-10T12:32:01+5:302018-03-10T12:32:01+5:30

Boll Ally Farmer: If the movement is not received, then the agitation | बोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदत न मिळाल्यास आंदोलन

बोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदत न मिळाल्यास आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील शेतकरी त्यापासून वंचीत राहणार आहेत. वास्तविक आकडेवारी पहाता या जिल्ह्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त कापूस लागवड ही नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. असे असतांना व जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांनी आवश्यक पुराव्यासह विनंती अर्ज मुदतीत सादर केले आहेत. तरीही शेतक:यांना मदतीपासून वंचीत ठेवणे म्हणजे एक प्रकारची क्रूर थट्टाच आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तात्काळ विचार करावा. अन्यथा शेतकरी शासनाचा महसूल, शेतसारा,व् कृषी वीजबील, पाणीपट्टी व घरपट्टी आदी कुठलाही शासकीय कर भरणार नाही. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास शासन जबाबदार राहणार असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.  निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील, शिवाजी पाटील, हरी दत्तू पाटील, भरत भबुता पाटील, सुदाम जाधव यांच्यासह इतर पदाधिका:यांच्या सह्या आहेत.

Web Title: Boll Ally Farmer: If the movement is not received, then the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.