नंदुरबार जि.प.चा शिक्षण व आरोग्याला भरारी पथकांचा बुस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:14 PM2018-07-01T13:14:24+5:302018-07-01T13:19:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य सेवेत काम करणा:या कर्मचा:यांची हजेरी तपासणे तसेच सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत करण्यात आला़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़
प्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, महिला व बालकल्याण समिती सभापती लताबाई पाडवी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती हिराबाई पाडवी, सदस्य जयपालसिंह रावल, अभिजित पाटील, रतन पाडवी, सागर धामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बागुल, जालिंदर पठारे, लेखाधिकारी अतुल गायकवाड, कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ एऩडी़ बोडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी़सी़ वांडेकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होत़े प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आल़े यानंतर समितीच्या अध्यक्षा रजनी नाईक यांनी विभागवार आढावा घेत कामकाजाची माहिती घेतली़
या वेळी समितीचे सदस्य जयपालसिंह रावल यांनी सारंगखेडा बॅरेजमधून सारंगखेडा, कळंबू आणि पुसनद येथील शेतक:यांच्या सोयीसाठी गाव तलाव भरून देण्याबाबत मंजुरी देऊनही लघुसिंचन विभागाचे अधिकारी मान्यता देत नसल्याचे सांगितल़े या विषयाला सर्वसाधारण सभेत मान्यता मिळूनही कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी हे कामात त्रुटी काढून काम लांबवत असल्याचे त्यांचे म्हणणे होत़े यावर संबंधित अभियंत्याची चौकशी करण्याबाबत ठराव करण्यात आला़
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नाईक यांनी अपंग युनिटअंतर्गत माध्यमिक शिक्षकांच्या भरतीतही घोळ झाल्याचे सांगून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली़ यावर समितीने ठराव करण्यास संमती दिली होती़ वित्त विभागाने अभिलेख ठेवण्यासाठी आठ रॅक खरेदी करण्याच्या ठरावाला या सभेत मान्यता दिली़ शिक्षणाधिकारी डॉ राहुल चौधरी यांनी जिल्ह्यात 425 नवीन शिक्षक बदलून आल्याची माहिती दिली़ यात 23 शिक्षक अपंग तर 47 शिक्षक-शिक्षिका यांचे पतीपत्नी एकत्रिकरणानुसार जिल्ह्यात बदलून आल्याचे त्यांनी सांगितल़े या चर्चेदरम्यान सदस्य पाडवी यांनी धडगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी हे नवीन शिक्षकांची दिशाभूल करत असल्याचे सांगितल़े दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षण येतात किंवा नाही़ याची चौकशी करण्यासाठी अधिका:यांचे भरारी पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली़ या मागणीला समितीने मान्यता देत ठराव करण्याची सूचना केली़ या ठरावानुसार जिल्ह्यात भरारी पथकांद्वारे शिक्षकांच्या हजेरीवर लक्ष ठेवण्यात येणार आह़े प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांबाबत जिल्हा परिषदेकडून शासनाच्या अॅपवर रिक्त पदांची मागणी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली़
दुर्गम भागातील जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी येत नसल्याच्या तक्रारी तसेच रोषमाळ येथील आरोग्य केंद्राच्या अपूर्ण इमारत बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली़ या वेळी अध्यक्षा रजनी नाईक आणि उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी पावसाळ्यात दुर्गम भागात सुविधा पुरवण्यासाठी कर्मचारी तपासणीची भरारी पथके नियुक्त करण्याचे सुचवल़े यानुसार प्रशासकीय पथक नियुक्त होणार आह़े