बोरवान यात्रेस रविवारपासून सुरुवात : तळोदा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:27 PM2018-02-18T12:27:09+5:302018-02-18T12:27:14+5:30
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 18 : तळोदा तालुक्यातील बोरवान (खर्डी) येथील देवमोगरा मातेच्या यात्रेस रविवारपासून सुरुवात होत आह़े याबाबत प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आह़े दरवर्षी मोठय़ा संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात़
बोरवान येथील पुजारी दिवाकर ठाकरे यांना देवमोगरा मातेने स्वप्नात दृष्टांत दिल्यापासून सुमारे 45 वर्षापासून हा यात्रोत्सव दरवर्षी सुरु करण्यात आला आह़े महाशिवरात्रीनंतर पाच दिवसांनी यात्रेला प्रारंभ होत असतो़ गेल्या 45 दिवसांपासून यात्रा सुरु असून दरवर्षी दर्शनासाठी येणा:या भाविकांच्या संख्येने झपाटय़ाने वाढ होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत़े ब्रिजलाल ठाकरे ही पुजारी म्हणून आपल्या वडीलांचा वारसा पुढेही कायम ठेवत आहेत़ धनपूर धरणाचे बांधकाम झाल्यानंतर धनपूर बोरवान रस्ता बंद आह़े भाविकांनी धनपूर-राणीपूर-बंधाराव खर्डी मार्गे बोरवान यात्रेस यावे असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े
यात्रेमध्ये दरवर्षी नवस फेडणा:यांची मोठी गर्दी असत़े यासाठी जिल्हाभरातून भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात़ भाविकांची गर्दी लक्षात घेता आयोजकांकडूनही सर्व नियोजन पूर्ण करण्यात आले आह़े त्याच प्रमाणे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आह़े यात्रेमध्ये मोठय़ा संख्येने व्यावसायिकही येत असल्याने मंदिराच्या परिसरात आपली दुकाने थाटण्यात व्यावसायिक मगअ आहेत़ या यात्रोत्सवानिमित्त भाविकांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आह़े