कोरोना रूग्णाच्या संपर्कातील दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:44 PM2020-07-25T12:44:09+5:302020-07-25T12:44:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील सरदार चौकमधील कंटेनमेंट झोनमध्ये ४५ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची व यासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील सरदार चौकमधील कंटेनमेंट झोनमध्ये ४५ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची व यासह इंदिरानगर, अवधुतवाडी येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कातील ६७ वर्षीय वृद्ध महिला व ८४ वर्षीय वृद्ध पुरूषाचे गुरवारी रात्री आकस्मिक निधन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
धुळे येथील रहिवाशी असलेले वृद्ध दांपत्य एक महिन्याआधी मुलीकडे आले होते. २० जुलै रोजी त्यातील ७२ वर्षीय वृद्धाची तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यावर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. प्रशासनाकडून परिवारातील एकास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या परिवारातील इतर सदस्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कातील ६७ वर्षीय वृद्ध महिलेची तब्येतीची आधीपासून कुणकुण सुरू होती. अशातच गुरूवारी रात्री वृद्ध महिलेची प्राणज्योत मालवली.
होम क्वॉरंटाईन केलेल्या घरातच अशी घटना घडाल्याचे कळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पुरवठा अधिकारी मिलिंद निकम, पालिकेचे आरोग्य निरिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली. कोविडच्या पार्श्वभूमीवर मोजक्या चार जणांच्या उपस्थितीत त्यांचेवर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या घरातील १० जणांना शुक्रवारी दुपारी चार वाजता विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. असाच प्रकार अवधुतवाडीत घडला. तेथील ५६ वर्षीय बाधीत इसमाच्या संपर्कातील ८४ वर्षीय वृद्ध पुरूषाचे हृद्यविकाराने शुक्रवारी निधन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचेवर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील खांडबारा येथील ३१ वर्षीय पुरूषाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना सुरत येथे नेण्यात आले आहे. शहरातील सरदार चौकात ४८ वर्षीय इसमाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर हा भाग कंटेनमेंट झोन जाहीर झाला आहे. याच भागातून शुक्रवारी ४५ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. इंदिरा नगर, अवधुतवाडी व सरदार चौक येथे प्रशासनाकडून तातडीने औषध फवारणी करण्यात आली.
तालुक्याची कोरोना रूग्णसंख्या आता २० वर पोहीचली आहे. गुरूवारी एकही रूग्ण कोरोना बाधीत निघाला नाही. दरम्यान आठवड्याच्या संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही शहरात संपूर्ण बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णत: बंद राहिलेत. पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त उभारला होता.
कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करा, सॅनिटायझर व मास्कचा महत्तम वापर करून शासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे पालन करा, असे आवाहन तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.