नंदुरबारातील प्रस्तावीत दोन्ही उड्डाणपूल बारगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:00 PM2018-04-27T13:00:21+5:302018-04-27T13:00:21+5:30
राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत होते प्रस्तावीत : रिंगरोडचाही प्रस्ताव रद्द, वाहतुकीचा ताण वाढणार
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 27 : राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या विसरवाडी-खेतिया यासह शेवाळे-नेत्रंग या महामार्गाअंतर्गत नंदुरबारातील दोन उड्डाणपुलांचा प्रस्ताव बारगळा आहे. आहे त्या बायपास रस्त्याचेच रुंदीकरण करून त्याला राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट केले जाणार आहे. दरम्यान, याआधीच शहराबाहेरून जाणा:या रिंगरोडचा प्रस्तावही फेटाळण्यात आला होता.
नंदुरबार शहराला दोन राष्ट्रीय महामार्ग व एक आंतर राज्य महामार्गाने जोडण्याचा प्रय} करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रिंगरोड व त्यानंतर दोन उड्डाणपुलांचा प्रस्ताव पुढे आला होता. त्याअंतर्गत प्राथमिक सव्र्हेक्षण देखील करण्यात आले होते. परंतु हे दोन्ही प्रस्ताव सध्या बारगळले आहेत. यामुळे शहरातूनच या दोन्ही महामार्गाच्या वाहतुकीचा ताण शहरवासीयांना सहन करावा लागणार आहे.
दोन महामार्गाना मंजुरी
जिल्हा मुख्यालय महामार्गाना जोडणे आणि मागास भागाचा विकास करणे या दृष्टीकोणातून नंदुरबार जिल्ह्यातून जाणा:या दोन महामार्गाना यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. अधिकृत घोषणा केंद्रीय भुपृष्ट वहातूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवापूर येथील कार्यक्रमात केली होती. विसरवाडी येथून सुरत-नागपूर महामार्गापासून निघून मुंबई-आग्रा महामार्गाला सेंधवानजीक जोडणारा विसरवाडी-सेंधवा हा एक महामार्ग व दुसरा सुरत-नागपूर महामार्गापासून शेवाळी फाटय़ापासून निघून ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला तळोदानजीक जोडणारा व पुढे तोच नेत्रंगर्पयत जाणारा असा शेवाळी-नेत्रंग महामार्ग असे दोन महामार्ग आहेत.
रिंगरोड नाही
हे महामार्ग नंदुरबार शहरातून जाणार असल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढणार म्हणून शहराबाहेरून रिंगरोड तयार करावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु महामार्गाअंतर्गत जमीन अधिग्रहणासाठी निधीच नसल्यामुळे रिंगरोडचा प्रस्ताव बारगळला. वेगळ्या योजनेच्या माध्यमातून रिंगरोडसाठी जमीन अधिग्रहण करून तयार करावा अशीही मागणी पुढे आली. परंतु ती देखील पुढे सरकू शकली नाही.
उड्डाणपूल बारगळले
रिंगरोड होणार नसल्यामुळे शहरातील बायपास रस्त्याचे रुंदीकरण करून त्याला महामार्गाचा दर्जा देण्याचे निश्चित करण्यात आले. या अंतर्गत शहरातील वाघेश्वरी चौफुली आणि करण चौफुली या दोन ठिकाणी उड्डाणपुल प्रस्तावीत करण्यात आले. त्यांचे प्राथमिक सव्र्हेक्षण देखील करण्यात आले. परंतु महामार्गाचा वाढता खर्च व त्यात उड्डाणपुलांचा खर्च परवडणारा नसल्यामुळे शहरातील प्रस्तावीत दोन्ही उड्डाणपुल रद्द करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.
वाहतुकीचा ताण वाढणार
शहरातील बायपास रस्ता हा आता शहराच्या मध्यभागी आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. आताच असलेल्या वाहतुकीचा ताण मोठा आहे. महामार्ग झाल्यास आणखी वाहतुकीचा ताण वाढणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेता रिंगरोडसाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. उड्डाणपुलांमुळे समस्या थोडीफार सुटली असती. परंतु आता तेही होणार नसल्यामुळे रिंगरोडच होणे आवश्यक ठरणार आहे.