शहादा व धडगाव येथे वेगवेगळ्या ठिकाणी दोघींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:25 PM2019-03-01T12:25:13+5:302019-03-01T12:25:22+5:30
गुन्हा दाखल : शहादा व धडगाव तालुक्यात घडल्या घटना
नंदुरबार : शहादा तालुक्यातील वडगाव (कोळपांझरी) शिवारात गतीमंद युवतीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरुन एकाविरोधात गुन्हा दाखल आहे़
वडगाव येथील गतीमंद युवती सोमवारी घरी एकटी असल्याचे पाहून युवराज सुकलाल पावरा (४०) याने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता़ यादरम्यान पावरा याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला़ याबाबत युवतीच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी युवराज पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी़डी़शिंदे करत आहेत़
मांडवी खुर्द ता़ धडगाव
मांडवी खुर्दचा देवबारपाडा येथे वाघदेव यात्रेत सायसिंग सेगा वळवी याने युवतीचा विनयभंग केला़ पिडीतेला बरे वाटत नसल्याने पूजा करुन देतो असे खोटे सांगून मंदिराच्या बाजूला अंधारात घेऊन जात त्याने हे कृत्य केले़ बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ याबाबत युवतीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायंसिंग सेगा वळवी रा़ जुगनीचा पानीआंबापाडा ता़ धडगाव याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक एस़बी़भामरे करत आहेत़