मंजुरीअभावी पुलाचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:29 PM2019-10-30T12:29:16+5:302019-10-30T12:29:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : दोन तालुक्यातील गावांना सोयिस्कर ठरणा:या कोठवा नाल्यावरील फरशी पुलाचे काम मंजूरीअभावी रखडले. त्यामुळे परिसरातील ...

The bridge works partially due to approval | मंजुरीअभावी पुलाचे काम अर्धवट

मंजुरीअभावी पुलाचे काम अर्धवट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : दोन तालुक्यातील गावांना सोयिस्कर ठरणा:या कोठवा नाल्यावरील फरशी पुलाचे काम मंजूरीअभावी रखडले. त्यामुळे परिसरातील नागरिकांची 12 वर्षापासून पायपीट सुरूच आहे.
शहादा व तळोदा तालुक्यातील अनेक गावांना सोयिस्कर असलेला तळोदा ते मोड  रस्त्यावरील फरशी पूल 12 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोठवा नाल्याच्या पुरात वाहून गेला होता. तळोदापासून खरवड, मोडमार्गे एसटी महामंडळाच्या बस जात होती, शिवाय खाजगी प्रवासी वाहतुक करणारी वाहने देखील जात होती. परंतु हा फरशी पूल तुटत्यामुळे दोन्ही तालुक्याच्या बहुतांश गावांमधील नागरिकांची गैरसोय होत आहे. या गैरसोयीचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची सुविधा ऊपलब्ध नसल्याने तळोदा तालुक्याच्या पूर्वेकडील घरुन ये-जा करीत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना देखील काही मिलोमिटर पायपीट करावी लागत आहे. या पुलासह रस्ता देखील वाहून गेल्यामुळे नागरिकांच्या होणा:या गैरसोयीत भर पडली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बांधकाम विभागामार्फत या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु हे काम काही वर्षापासून आजही अर्धवट राहिले आहे. त्यामुळे 12 वर्षापासून खरवड, करणखेडा, कढेल, गुंजाळी, कळमसरे, छोटा धनपूर व मोहिदासह अनेक गावातील नागरिकांची पायपीट सुरूच आहे. 
सीमावर्ती भाग असून देशातील मोठय़ा बाजारपेठांपैकी एक ठिकाण असलेल्या सुरत येथे तळोदासह शहादा तालुक्यातील नागरिक नेहमीच जात असतात. मोठी तथा अनेक व्यवसायांना योग्य बाजारपेठ असल्यामुळे तेथे जाणा:या व्यावसायीक व नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यात बोरदमार्गे जाणा:यांची संख्या सर्वाधिक असल्याचे म्हटले जाते. तुटेल्या फरशी पुलामुळे या सर्व व्यावसायीक व नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. शिवाय जिल्ह्याचे ठिकाण असल्याने बोरद परिसरातून नंदुरबारला येणा:या व जाणा:यांची संख्याही अधिक होती. परंतु  नंदुरबार आगाराची बस बंद झाल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. 
 

Web Title: The bridge works partially due to approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.