वनक्षेत्रातील दीड हजार हेक्टर वन अतिक्रमणावर फिरवले बुलडोझर

By भूषण.विजय.रामराजे | Published: April 26, 2023 02:16 PM2023-04-26T14:16:11+5:302023-04-26T14:27:29+5:30

जिल्ह्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई

Bulldozer moved on one and a half thousand hectares of forest encroachment in Nandurbar forest area | वनक्षेत्रातील दीड हजार हेक्टर वन अतिक्रमणावर फिरवले बुलडोझर

वनक्षेत्रातील दीड हजार हेक्टर वन अतिक्रमणावर फिरवले बुलडोझर

googlenewsNext

भूषण रामराजे, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार: वनविभागाच्या नंदुरबार वनक्षेत्रातील सोनपाडा आणि भांगडा वनक्षेत्रात दीड हजार हेक्टरवर करण्यात आलेले अतिक्रमण वनविभागाच्या पथकाने नष्ट केल्याची कारवाई करण्यात आली आहे. ३ मार्चपासून सुरु असलेली ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा संपुष्टात आली. पावणेदोन महिने सुरु असलेली ही कारवाई आजवरची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार रोहयो वनक्षेत्रांतर्गत सोनपाडा आणि भांगडा कक्षातील राखीव क्षेत्रात गुजरात राज्यासह स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. एकूण १ हजार ६०० हेक्टरवर अतिक्रमण करुन पीक पेरा करण्यात आल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आल्यानंतर मोहीम हाती घेण्यात आली होती. अतिक्रमितांना समज देत वनविभागाने ३ मार्च रोजी अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला होता. वनविभागाने एकूण १ हजार ५२५ हेक्टर क्षेत्रातील वन अतिक्रमण नष्ट करुन वनजमिनीवर ताबा मिळवला आहे. अतिक्रमण नष्ट केल्यानंतर पुन्हा वनजमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी यंत्रांच्या साहाय्याने खोल सलग समतल चर खोदकाम करुन वन जमीन संरक्षित करण्यात आली आहे.

ही कारवाई धुळे वनविभागाचे वनसंरक्षक डी.व्ही.पगार, विभागीय वनाधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल प्रियंका निकुंभे, अरविंद निकम, किसन वसावे, नयना हाडस, दीपक विभांडिक, रवी गिरासे, दिनेश वळवी, रुपेश वसावे यांनी केली.

Web Title: Bulldozer moved on one and a half thousand hectares of forest encroachment in Nandurbar forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.