जलसंधारणासाठी सर्वस्तरीय नागरिकांचा गट बांधणार बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:59 AM2019-06-01T11:59:24+5:302019-06-01T11:59:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळामुळे पाणीटंचाई आणि नापिकी सोसणा:या तळोदा तालुक्यात सर्वस्तरातील नागरिक एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुष्काळामुळे पाणीटंचाई आणि नापिकी सोसणा:या तळोदा तालुक्यात सर्वस्तरातील नागरिक एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे करणार आहेत़ या कामांना लोकवर्गणी आणि लोकसहभागाची जोड दिली जाणार असून याबाबत परवानगी मिळावी म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत परवानगी मागितली आह़े
निवेदनात, तळोदा तालुक्यातील भूजल पातळी गेल्या काही वर्षात 800 फूटार्पयत खोल गेली आह़े यामुळे तालुक्यात प्रथमच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आह़े यातून विविध प्रश्न निर्माण झाले आहेत़ यावर मात करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन लोकचळवळ चालवली आह़े यातून लोकवर्गणी व सहभाग देत विविध उपक्रम होणार आहेत़ यात पाणी जिरवण्यासाठी नद्यांची नांगरटी करणे, नद्या, शासकीय किंवा निमशासकीय जागांवर विविध आकारमानाचे खड्डे करण्यासाठी परवानगी, तळोदा शहरातील शासकीय, खाजगी, सार्वजनिक कूपनलिका व विहिरींचे पुर्नभरण करणे, गाव तलावातील गाळ काढून खोली वाढवणे, पावसाळ्यात वाहून जाणा:या पाण्याची गती कमी करण्यासाठी व जलसाठा व्हावा म्हणून नद्या, नाले, ओढे यांच्या प्रवाहात गॅबियन बंधारे बांधण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आह़े सोबतच शासकीय तांत्रिक सहाय्य आणि विविध प्रकारचे वाहतूक परवाने देण्याची मागणीही करण्यात आली आह़े
निवेदनावर प्रा़ मित्तलकुमार टवाळे, लवकुमार नथ्थू पिंपरे, विजय सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, विजय पाडवी, चेतन इंगळे, सम्राट महाजन, राजेश माळी, दिलीप मोरे, अंबालाल साठे, प्रा़ज्योत्सना काशीनाथ पिंपऱे पंकज तांबोळी, अशोक तुकाराम वाघ, मुकेश प्रताप कापुरे, महेश तुळशीराम माळी, प्रकाश श्रीराम माळी, सुशिलकुमार सूर्यवंशी, वसंत मराठे, पंकज राणे यांच्यासह शहरातील नागरिकांच्या सह्या आहेत़