नाला खोलीकरणाची कामे बोगस : नंदुरबार जि़.प़. स्थायी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:19 PM2018-08-22T13:19:46+5:302018-08-22T13:19:53+5:30
सदस्य संतप्त, विविध 13 विषयांना मंजूरी
नंदुरबार : लघुसिंचन विभागाने गेल्या तीन वर्षात बामखेडा ता़ शहादासह जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेली कामे बोगस असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील यांनी स्थायी समितीच्या सभेत केला़ सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक होत्या़
सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, मनिष सांगळे, डॉ़ सारिका बारी, अशोक बागुल, आरोग्य व शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, सदस्य रतन पाडवी, सागर तांबोळी, अभिजीत पाटील, शिक्षणाधिकारी डॉ़ राजेंद्र कांबळे, समाजकल्याण अधिकारी सतीष वळवी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होत़े
सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आल़े यानंतर आरोग्य विभागाचा 1 आणि बांधकाम विभागाच्या 12 ठरावांना मंजूरी देण्यात येऊन कामकाज सुरू करण्यात आल़े सभेदरम्यान विभागनिहाय आढावा घेत असताना लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीवर प्रश्न विचारत नाला खोलीकरणाच्या कामांची स्थिती अत्यंत गंभीर असून अधिकारी सदस्यांनी तक्रारी करूनही गांभिर्याने घेत नसल्याचे सदस्य अभिजीत पाटील यांनी सांगितल़े सागर तांबोळी यांनी चौपाळे रस्ताकाम करण्याची मागणी केली़
विविध विभागांचा आढावा घेण्यात आल्यानंतर माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजाचा समारोप करण्यात आला़ सभेत अभिजीत पाटील यांनी केलेल्या आरोपावर बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी अधिकारीच ऐकत नसतील तर काय करावे अशी हतबलता दर्शवत कामचुकारपणा करणा:या अधिका:यांवर कारवाई करण्याचे प्रशासनाला सांगितल़े उपाध्यक्ष सुहास नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी यांनीही या प्रकाराला गांभिर्याने घेत कारवाई करण्याच्या सूचना सभेत दिल्या़
नाला खोलीकरणाच्या कामांबाबत तक्रार करणारे अभिजीत पाटील यांनी बोगस कामे कशाप्रकारे केली जातात याची फाईलच यावेळी उपस्थितांना दाखवली़ बामखेडा येथील कामासाठी 18 लाख रूपये खर्च करून 1 लाखाचे काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितल़े याकामाचे बिल संबधितास अदा करण्यात आले असून ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला न घेताच लघुसिंचन विभागाने बिल मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितल़े अधिकारी खोलीकरणाच्या कामांमध्ये गैरव्यवहार करताना एकच फाईल ङोरॉक्स करून इतर कामांसाठी वापरत बिलांची वसुली करत असल्याचा आरोपही त्यांनी सभेत केला़ त्यांच्या या आरोपांमुळे सभेतील अधिकारी निरूत्तर झाले होत़े