पाटय़ांअभावी बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:51 AM2017-09-10T11:51:26+5:302017-09-10T11:51:26+5:30

लाखो रुपयांचा खर्च वाया : जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील स्थिती

 Bundles are being used because they are unprotected | पाटय़ांअभावी बंधारे ठरताहेत निरुपयोगी

पाटय़ांअभावी बंधारे ठरताहेत निरुपयोगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळ परिसरात शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले केटीवेअर बंधारे पाटय़ांअभावी निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांच्या पाणी अडविण्यासाठी लागणा:या लोखंडी पाटय़ा चोरीला गेल्याने पाणी साठवता येत नाही. याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असून  पावसाचे पाणी वाहून जात असल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शहादा तालुक्यातील कोंढावळ, जयनगर, उभादगड बोराळा, कुकावल, कोठली  वडाळी परिसरात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र बंधा:यांमध्ये पाणी साठवण्यासाठी लागणा:या पाटय़ाच गायब झाल्याने सद्यस्थितीत हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे शेतक:यांनी केली. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात हे बंधारे कोरडेठाक झाले आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाची ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना फक्त कागदावरच मर्यादित असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतक:यांना खरीपासह रब्बी व उन्हाळी पिके घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या बंधा:यांमध्ये जर पुरेसा पाणीसाठा झाला तर परिसरातील जमिनीत जलपातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. परंतु बंधा:यांमध्ये पाणीसाठाच होत नसल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल जात आहे.
यंदाही पावसाचे प्रमाण अपेक्षेनुसार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामासाठी टाकलेला पैसा निघेल की नाही याबाबत शाश्वती नाही. किमान या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकून पाणी अडवले गेले तर रब्बी हंगामाला तरी फायदा होऊन पिके घेतात येतील, अशी आशा शेतक:यांना आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तुटलेले व नादुरुस्त बंधारे आणि पाटय़ा नसलेल्या बंधा:यांचा सव्रे करून त्यांची दुरुस्ती व पाटय़ा टाकण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.

Web Title:  Bundles are being used because they are unprotected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.