ऐन दुष्काळात परीक्षा शुल्कांचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:15 PM2018-10-27T12:15:22+5:302018-10-27T12:16:56+5:30
नंदुरबार : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी तालुक्यातील विद्याथ्र्याना विविध शैक्षणिक शुल्कासह अन्य सवलती देण्याचे ...
नंदुरबार : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी तालुक्यातील विद्याथ्र्याना विविध शैक्षणिक शुल्कासह अन्य सवलती देण्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कधी होते याकडे जिल्ह्यातील विद्याथ्र्याची लक्ष लागून आह़े
नंदुरबार जिल्ह्यात शहादा, अक्कलकुवा तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर करण्यात आलेली आह़े आधीच पाण्याअभावी शेतीची वाताहत झालेली असताना दुसरीकडे शैक्षणिक खर्चाचा बोजाही दुष्काळग्रस्तांना सहन करावा लागत आह़े
शासनाकडून अद्याप दुष्काळ सदृश्य जिल्हे जाहिर करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास अद्याप बराच वेळ आह़े
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 50 महाविद्यालये कवयित्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित आहेत़ दुष्काळी तालुक्यांमध्ये विद्याथ्र्याच्या 50 टक्यांर्पयत शैक्षणिक शुल्कात सवलत मिळाल्यास याचा फायदा जिल्ह्यातील हजारो विद्याथ्र्याना मिळणार आह़े यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के पाऊस झाला असल्याने पिकांची स्थिती अत्यंत दैनिय झालेली आह़े अनेक ठिकाणी उभी पिक जळालेली दिसून येत आह़े त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागात त्वरीत मदतकार्य सुरु करुन तातडीने विद्याथ्र्याच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी होत आह़े अनेक ठिकाणी विद्याथ्र्याकडून शैक्षणिक वर्षाचा संपूर्ण शुल्क आकारण्यात येत आह़ेकमी पजर्न्यमान यातून निर्माण झालेला दुष्काळ यामुळे दुष्काळग्रस्त भागात आर्थिक चणचण निर्माण झालेली आह़े यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आह़े विद्यापीठाच्या नियमानुसार विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्क एकाच वेळी आकारण्यात येत आहेत़ त्यामुळे ऐवढा शुल्क भरणे येथील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील विद्याथ्र्याना परवडण्यासारखे नाही़ शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असला तरी सध्याच पूर्ण शैक्षणिक शुल्क भरावा लागत असल्याने विद्यार्थी विवंचनेत आहेत़