तळोद्यातील कालिका माता यात्रोत्सवात चोरटय़ांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:45 PM2018-04-23T12:45:42+5:302018-04-23T12:45:42+5:30
तळोदा : चोरीचे प्रमाण वाढल्याने भाविकांमध्ये भितीचे वातावरण
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 23 : तळोदा येथे अक्षय्यतृतीयेनिमित्त भरणा:या कालिका माता यात्रोत्सवात सोनसाखळी चोरटय़ांचा सुळसुळाट आह़े त्यामुळे यात्रा पाहण्यासाठी येणा:या भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े
तळोदा येथील तीन महिलांची सोनसाखळी लांबविल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ ज्या आठवडे बाजारात यात्रा भरलेली आहे ती जागा अतिशय अरुंद असल्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन महिलांना धक्काबुक्की केली जात असत़े पोलिसात तीन महिलांनी तक्रार नोंदवली असली तरी प्रत्यक्षात सहा महिलांची सोनसाखळी लंपास झाल्याचे म्हटले जात आह़ेचोरीच्या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड भिती पसरली आह़े पोलिसांनी यात्रेच्या ठिकाणी अधिक बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आह़े दरम्यान, वीज वितरण कंपनीनेसुध्दा सातत्याने अधून-मधून खंडित होणा:या वीजपुवठय़ाबाबत ठोस उपाय योजना करणे आवश्यक आह़े
तळोदा येथील यात्रोत्सव गेल्या गुरुवारपासून सुरु झालेला आह़े शहराच्या आठवडे बाजारात कालिका मातेच्या यात्रोत्सव गेल्या अनेक वर्षापासून भरविण्यात येत आह़े सध्या पडत असलेल्या प्रखर उन्हामुळे शहरासह तालुक्यातील सर्वच यात्रेकरु दिवसापेक्षा सायंकाळी सहावाजेनंतर यात्रेला हजेरी लावत आहेत़ विविध प्रकारचे पाळणे, मौतका कुवा, भांडी, सौदर्य प्रसादणे, गृहपयोगी साहित्ये आदी प्रकारच्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत़ या ठिकाणीच यात्रेकरुंची मोठी गर्दी होत आह़े विशेषत महिलांचा त्यात मोठा समावेश आह़े यात्रेची जागा अत्यंत अरुंद असल्यामुळे अनेक वेळा चेंगराचेंगरीदेखील होत असत़े काही टारगट युवक याचा फायदा घेत महिलांच्या जवळ जात असचेही संबंधित महिलांकडून सांगण्यात आले आह़े यात, काही चोरटय़ांनीही संधी साधली आह़े कारण या गर्दीचा फायदा घेत शहरातील कल्याणी जयेश सूर्यवंशी, निलीमा रमेश कलाल व जोत्स्ना शरद मगरे या तीन महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी पाच ग्रामची सोनसाखळी ओढून चोरटय़ांनी पळ काढला़ या चोरीमागे महिलाच असल्याचे म्हटले जात आह़े या प्रकरणी महिलांच्या तक्रारीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहाय्यक फौजदार दिंगबर दाभाडे करीत आहेत़
दरम्यान, आठवडे बाजारात यात्रेकरुंची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवावा, त्यातही महिला पोलीस कर्मचा:यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आह़ेवास्तविक आठवडे बाजाराची जागा अत्यंत अरुंद आह़े असे असताना जागेबाबत पालिका प्रशासनाने उदासिनतेची भूमिका घेतली आह़े
या शिवाय वाढी बंदोबस्ताबाबत पोलीस सकारात्कता दाखवत नसल्याचा आरोप करण्यात येत आह़े साहजिकच यात्रे दरम्या महिलांना आपल्या सुरक्षेला तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा आह़े