स्मशानभुमीतच ठोकल्या चोरट्याला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 11:53 AM2019-12-08T11:53:37+5:302019-12-08T11:53:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहाद्यातील भर दिवसा झालेल्या घरफोडीतील अल्पवयीन संशयीतांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने भल्या पहाटे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहाद्यातील भर दिवसा झालेल्या घरफोडीतील अल्पवयीन संशयीतांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने भल्या पहाटे स्मशानभुमीतून ताब्यात घेतले.
शहादा येथील वीज कंपनीच्या वसाहतीमधून दयाराम अनंत भामरे यांचे घराचा कडीकोंडा तोडुन चोरट्यांनी ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. दिवसा झालेल्या घरफोडीने चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने चोरीचा समांतर तपास सुरू केला होता. त्यांना आवारात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत मिळाली. चोरीच्या दिवशी दोन संशयीत युवक फिरतांना दिसून आले. त्यातील एक अट्टल चोरटा निघाला. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पुर्ण दिवस घालविला परंतु उपयोग झाला नाही. अखेर पहाटे माहिती मिळाल्यावरून पथक थेट शहादा अमरधाममध्ये पोहचले. अमरधामला वेढा घालून त्याचा शोध घेतला असता तेथे तो आढळताच त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याने सोबत एक साथीदार असल्याचे सांगितले. तो देखील अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, हवालदार दिपक गोरे, प्रदीपसिंग राजपुत, मोहन ढमढेरे, सतिष घुले यांच्या पथकाने केली.