सेंद्रीय खताच्या वाहतुकीसाठी आता बसचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:16 PM2020-07-15T12:16:05+5:302020-07-15T12:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे तयार करण्यात येणारे सेंद्रीय खत महाराष्टÑासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात पाठविले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे तयार करण्यात येणारे सेंद्रीय खत महाराष्टÑासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात पाठविले जात असून, त्याची वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरसह आता राज्य परिवहन महामंडळाच्या माल वाहतूक सेवेने सुरू झाली आहे.
विविध भागातील शेतकरी हे खत घेण्यासाठी सातपुडा साखर कारखान्यावर येत आहेत. मंगळवारी शिरपूर, जि.धुळे येथील शेतकऱ्यांनी सेंद्रीय खत घेण्यासाठी चक्क एस.टी. महामंडळाच्या माल वाहतूक एस.टी. बस आणल्याने या प्रकल्पातील काम करणारे कामगार तसेच परिसरात राहणारे ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. हा विषय परिसरात कुतुहलाचा ठरला.
रासायनिक खतांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सातपुडा सहकारी साखर कारखान्याकडून मागील अनेक वर्षापासून सेंद्रीय खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून पुष्पकमल नामक खताची निर्मिती होऊ लागली आहे. परंतु साध्या सेंद्रीय खतात फॉस्फोरसची मात्रा वाढ करण्याकरीता रॉक फॉस्फेट मिश्रण करून व त्यावर प्रक्रिया करून फॉस्फोरस रिच आॅरगॅनिक मॅन्युअर प्रॉम तयार केले जात आहे. या खतात आॅरगॅनिक स्वरूपात १०.४ टक्के पर्यंत फॉस्फोरस उपलब्ध होईल. सोबत नत्र, पालाश, सिलिकॉन, सल्फर, कॅल्शिअम व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरूपात उपलब्ध होतील आणि जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता वाढेल. जमीन भुसभुशीत होईल. त्यामुळे पिकांमध्ये पांढरे मूळ जास्त प्रमाणात निघतील आणि पिकांची वाढदेखील चांगली होत. हे खत सर्व पिकांना उपयुक्त असल्याने त्यास शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. उसासाठी एकरी पाच बॅग लागवडीच्या वेळेस आणि पाच बॅग मोठी बांधणीच्या वेळेस वापर केला तर चांगले परिणाम जाणवून येतील. तसेच या खताचा वापर केल्यानंतर ५० टक्के रासायनिक खताची मात्रा कमी करता येईल.
रासायनिक खतास पर्याय म्हणून सेंद्रीय खत ताकदवर असले पाहिजे ही संकल्पना ठेऊन या सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात आली असून, त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान सातपुडा साखर कारखान्यातर्फे शेतकºयांना रासायनिक खतांच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.