टँकर खाक तर बस रस्त्याखाली उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:27 PM2019-09-02T12:27:00+5:302019-09-02T12:27:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/नवापूर : चरणमाळ घाटात रसायन भरलेले टँकर उलटून जळाल्याची तर नंदुरबारनजीक नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना  घेवून जाणा:या ...

The bus went down the road and tanker khak | टँकर खाक तर बस रस्त्याखाली उतरली

टँकर खाक तर बस रस्त्याखाली उतरली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/नवापूर : चरणमाळ घाटात रसायन भरलेले टँकर उलटून जळाल्याची तर नंदुरबारनजीक नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना  घेवून जाणा:या बसचा अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घटली. यात किरकोळ जखमी वगळता मोठी जिवीत हानी झाली नाही. 
चरणमाळ घाटातील वळणावर रसायन भरलेला टँकर उलटल्याने आग लागून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, कालच शिरपूर येथे रसायन कंपनीत स्फोट झाल्यानंतर ही घटना घडल्याने प्रशासनाची काही काळ धावपळ उडाली. 
नाशिककडून गुजरातकडे रसायन घेवून जाणारा टँकर पिंपळनेर- चरणमाळ रस्त्यावरील चरणमाळ घाटातील अवघड वळणावर उलटला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटल्याची चर्चा आहे. ज्वलनशील रसायन असल्यामुळे टँकरने लागलीच पेट घेतला. या अपघातात जीवीत हानी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर आणि टँकर जळत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अगिAशमन बंब पोहचण्याआधीच टँकर पुर्णपणे जळून खाक झाला होता. सायंकाळी उशीरा घटनेचा पंचनामा करण्यात आला. नवापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 
बस रस्त्याखाली उतरली
नंदुरबार तालुक्यातील पथराई पळाशी शिवारातील केडी गावित शाळेजवळ पिकअप व्हॅन ओव्हरटेकच्या नादात गुजरात राज्यातील आनंद येथील रोटरी क्लब ची बस रस्त्याखाली उतरली.
या अपघातात नंदुरबारहुन  मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणा:या ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ दुखापत झाली आहे सदर अपघात  रविवारी दुपारी झाला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशीरार्पयत सुरू होते. 


नंदुरबारातून गुजरातमध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी दर महिन्याला अनेक रुग्ण जात असतात. त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था संबधीत आयोजकांकडून करून देण्यात येते. त्यानुसार रविवारी देखील 30 ते 40 जण गुजरातकडे रवाना झाले होते. परंतु नंदुरबारपासून पाच किलोमिटर अंतरावरच त्यांच्या बसला अपघात  झाला. त्यात काहींना किरकोळ जखमा झाल्याने त्यांना पुन्हा घरी नेण्यात आले. 
 

Web Title: The bus went down the road and tanker khak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.