जिल्ह्यातील बसेस आणि रेल्वेस्थानकातील गाडय़ा ‘स्टँडबाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:49 PM2020-04-17T12:49:23+5:302020-04-17T12:49:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे प्रथमच रेल्वे आणि महामंडळाच्या बसेस एवढय़ा दीर्घ कालावधीसाठी बंद आहेत़ या काळात त्यांची ...

Buses and trains in the district are 'standby' | जिल्ह्यातील बसेस आणि रेल्वेस्थानकातील गाडय़ा ‘स्टँडबाय’

जिल्ह्यातील बसेस आणि रेल्वेस्थानकातील गाडय़ा ‘स्टँडबाय’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे प्रथमच रेल्वे आणि महामंडळाच्या बसेस एवढय़ा दीर्घ कालावधीसाठी बंद आहेत़ या काळात त्यांची स्वच्छता करण्यासह दैनंदिन पाहणी करुन सर्वच गाडय़ा सज्ज ठेवण्यात आल्याचे रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आल़े एसटी महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातील प्रत्येकी 20 बसेस ह्या अत्यावश्यक  सेवेसाठी सज्ज ठेवल्या आहेत़ 
गर्दी होऊन कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने रेल्वेची सर्वच कामे बंद करण्यात आली आहेत़ प्रवासी गाडय़ा बंद असल्या तरी कोळसा, धान्य, फळे, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणा:या मालगाडय़ा धावत आहेत़ या पाश्र्वभूमीवर गँगमन, ट्रॅकमन आणि अधिकारी हे नियमित कामकाज करत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आल़े नवापुर ते दोंडाईचा दरम्यान नियमित ट्रॅक तपासणी, गेटची पाहणी व इतर कामांवर भर दिला जात आह़े मजूर आणि कर्मचा:यांची गर्दी टाळली जावी म्हणून रेल्वेकडून सुरु असलेली बांधकामेही बंद ठेवण्यात आली आहेत़ केंद्र शासनाकडून आदेश आल्यानंतरच रेल्वे सुरु होणार असली तरीही अत्यावश्यक वेळेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आल़े 
दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या शहादा, नंदुरबार, नवापुर आणि अक्कलकुवा आगारात पूर्णपणे शुकशुकाट आह़े प्रत्येक आगारात बसेस लावून ठेवण्यात आल्या आहेत़ बसेस यापूर्वीच स्वच्छ करण्यात आल्या असल्याने त्यांची दैनंदिन स्वच्छता करणे थांबवण्यात आले आह़े यंत्रशाळांमध्ये कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येणे शक्य असल्याने त्यांना सुटी देण्यात आली आह़े शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक आगारात 20 गाडय़ा ह्या सज्ज ठेवण्यात आल्या असून त्यासाठीचे चालक-वाहकही तयार ठेवण्यात आले आहेत़ परंतू अद्याप या गाडय़ांना बाहेर काढण्याची गरज पडलेली नसल्याने नियुक्त चालक वाहक केवळ हजेरी लावून परत जात आहेत़ 
नंदुरबारसह इतर चारही आगारांचे सरासरी 30 लाख रुपयांचे नुकसान दर दिवशी होत आह़े परंतू येत्या काळात बसेस पुन्हा सुरु झाल्यास नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आल़े  उन्हाळ्यात यात्रा, सुटय़ा, लगAसराई यामुळे बसेसमध्ये प्रवासी वाढून उत्पन्न वाढीवर भर दिला जात होता़ परंतू लॉकडाऊनमुळे या उत्पन्नावर यंदा पाणी फेरले गेले आह़े 

Web Title: Buses and trains in the district are 'standby'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.