अतिक्रमीतांना कंटाळून व्यापा:यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:15 PM2019-07-09T12:15:54+5:302019-07-09T12:15:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहर बसस्थानक परिसरात बेकायदेशीर टप:या व हातगाडय़ा हटवण्याची मागणी करत 200 व्यापा:यांनी 5 तास ...

Business banned by encroachers: closure of | अतिक्रमीतांना कंटाळून व्यापा:यांचा बंद

अतिक्रमीतांना कंटाळून व्यापा:यांचा बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहर बसस्थानक परिसरात बेकायदेशीर टप:या व हातगाडय़ा हटवण्याची मागणी करत 200 व्यापा:यांनी 5 तास दुकाने बंद पाळत उपद्रवी अतिक्रमणधारकांचा निषेध केला़ व्यापा:यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली़ 
नंदुरबार बसस्थानक परिसरात बांधलेल्या व्यापारी संकुलासमोर किरकोळ व्यवसाय करणा:यांनी अतिक्रमण केले आहे. यात चहा व खाद्यपदार्थ विक्रीसह पानाच्या टप:या येथे चालवल्या जात आहेत़  या अतिक्रमित व्यावसायिकांमुळे याठिकाणी गर्दी होऊन पायी ये-जा करण्यासह जागा मिळत नाही़ परिणामी व्यावसायिकांच्या दुकानांर्पयत ग्राहक येत नसल्याचे प्रकार घडले होत़े यातून अतिक्रमितांनी गाळेधारकांना धमक्या देण्याचे प्रकार घडल्याने सोमवारी सकाळी व्यापा:यांनी बंदचा पवित्रा घेत दुकाने बंद ठेवली होती़ 
जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना साई रचना व्यापारी असोसिएशनतर्फे व्यापा:यांनी निवेदन देत अतिक्रमण करणा:यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली़ निवेदनावर रघुनाथ माळी, पवन आहूजा, हरीश जाधव, राम ठक्कर, आकाश जयस्वाल, पद्मसिंह राजपूत, निलेश वाधवानी, जयराम कालानी, गोविंद  सोमानानी, योगेश वाघेला, उमेश वरसाळे, जगदीश राजपुरोहित, सचिन सोनवणे, सतीश ठक्कर, मुकेश वाधनावी, भास्कर माळी, दर्शन ठक्कर, मेहुल कोठारी, कमलाकर शिरसाठ, लक्ष्मण पेंढारकर, अनिल मोरे, मुकेश तेजवानी, चंद्रकांत चौधरी, सागर सोमानी, राकेश ठक्कर यांच्या सह्या आहेत़ 
जिल्हाधिकारी मंजुळे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापा:यांनी 12 वाजेच्या सुमारास व्यवसाय सुरु केल़े या बंदमुळे शहरात आलेल्या प्रवाशांसह ग्राहकांचे हाल झाल़े 

व्यापारी संकुलाच्या बाहेरील बाजूस होणा:या बेकायदेशीर अतिक्रमणांची चित्रफित असोसिएशनच्या पदाधिका:यांनी जिल्हाधिकारी यांना दाखवली़ व्यापारी असोसिएशनच्या पदाधिका:यांनी विविध समस्या मांडल्या. पालिकेमार्फत अतिक्रमितांवर कारवाई व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचीही व्यापारी भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
 

Web Title: Business banned by encroachers: closure of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.