व्यापा:याअभावी कांदा उत्पादक अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:35 AM2019-01-12T11:35:22+5:302019-01-12T11:35:26+5:30
नंदुरबार : शासनाने कांद्याला प्रती क्विंटल 200 रुपयांचे अनुदान देण्याचे जाहिर केले आह़े यातून शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत असला ...
नंदुरबार : शासनाने कांद्याला प्रती क्विंटल 200 रुपयांचे अनुदान देण्याचे जाहिर केले आह़े यातून शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील उत्पादक मात्र या अनुदानापासून वंचित आहेत़ नंदुरबार बाजारात कांदा खरेदी करण्यासाठी परवानाधारक व्यापारीच नसल्याने ही समस्या उद्भवली आह़े
हेक्टरी 1 हजार किलोर्पयत कांदा उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांकडून घेण्यात येत़े गेल्या दोन वर्षात दुष्काळामुळे या उत्पादनात घट झाली असल्याने बाजारातील कांदा आवकवर परिणाम झाला आह़े नंदुरबार आणि शहादा तालुक्यात साधारण 1 हजार 500 हेक्टर्पयत लागवड होणा:या कांद्याचे उत्पादन शहादा आणि नंदुरबार येथील बाजार समित्यांच्या आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये विक्री होत असल्याने त्याची नोंद होत नाही़ परिणामी परवानाधारक व्यापा:याची नियुक्ती याठिकाणी होऊ शकलेली नाही़ शहादा बाजारापेक्षा नंदुरबार येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आह़े याठिकाणी नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागासह साक्री तालुक्यातून कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत़े दर न मिळाल्यास कांदा उत्पादक शेतकरी माल घेऊन परत जाण्याचे प्रकारही येथे घडले आहेत़ प्रामुख्याने शेतक:यांकडून येथे हलक्या दर्जाचा (बोथरी) कांदा विक्रीसाठी आणला जातो आह़े या कांद्याला अहमदाबाद आणि इंदौर येथील बाजारापेक्षा कमी दर दिले जात असल्याने अनेकवेळा शेतक:यांचे नुकसान होत़े शेतक:यांनी चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी आणल्यास बाजार समितीकडून येथे नियुक्त होणा:या स्वतंत्र कांदा खरेदीदाराची संख्या वाढून नंदुरबार बाजार समिती अधिकृतपणे कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाऊ शकेल़ राज्यात कांदा उत्पादकांनी आंदोलन करुन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रतीक्विंटल 200 रुपये अनुदान देण्याची हमी दिली आह़े नंदुरबार येथील उत्पादकांना हे अनुदान मिळण्याची मागणी होऊ लागली असल्याने बाजार समितीने हालचाली सुरु करुन कापूस खरेदी केंद्राप्रमाणेच नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे खरेदी केंद्र सुरु करण्याची तयारी दर्शवली आह़े