व्यापा:यांच्या लुटीच्या घटनांबाबत विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:23 PM2018-11-25T13:23:27+5:302018-11-25T13:23:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा, निझर, नवापूर, खांडबारा रस्त्यांवर व्यापा:यांना लुटणा:या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करावा. याकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा, निझर, नवापूर, खांडबारा रस्त्यांवर व्यापा:यांना लुटणा:या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करावा. याकडे दुर्लक्ष करणा:या संबधीत पोलीस अधिका:यांवर कारवाई करावी अशा आशयाची लक्षवेधी विधान परिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडली आहे.
गेल्या पाच ते सहा महिन्यात तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार व शहादा तालुक्यात मुख्य रस्त्यांवर व्यापा:यांना अडवून त्यांना लुटणे, मारहाण करणे असे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठवडय़ात देखील तळोदा-प्रकाशा रस्त्यावर नंदुरबारातील चार व्यापा:यांना मारहाण करून त्यांच्याकडील चार लाख रुपयांची रक्कम लुटारूंनी लुटून नेली. वारंवारच्या या घटनांमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. व्यापा:यांनी आमदार रघुवंशी यांना याबाबत साकडे घातले. या पाश्र्वभुमीवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी मांडली आहे. 672 क्रमांकाची ही लक्षवेधी लवकरच विधानपरिषदेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.
लक्षवेधी सुचनेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे की, हातोडा मार्गावर तळोदा, निझर, अक्कलकुवा, खापर परिसरातील व्यापारी नेहमीच वसुलीसाठी व व्यापारासाठी ये जा करतात. याशिवाय नवापूर, विसरवाडी, खांडबारा, बोरद-प्रकाशा मार्गावर देखील व्यापा:यांची नेहमीच ये-जा असते. अशा व्यापा:यांना हेरून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व ऐवज चोरले जात आहे. हे प्रकार संघटीत गुन्हेगारांकडून, त्यांच्या टोळीकडून होत आहे. या टोळ्यांकडे पोलीस विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष आहे. अशा पोलीस अधिका:यांवर कारवाई करावी व लुटमारीचे हे प्रकार तातडीने थांबवावे. या प्रकारांमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. व्यापारावर परिणाम झाला असून बंदचेही आवाहन त्यांनी केले असल्याचे या लक्षवेधीत आमदार रघुवंशी यांनी नमुद केले आहे.