शहादा खरेदी केंद्रात 10 दिवसात 950 क्विंटल हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:58 AM2018-04-20T10:58:55+5:302018-04-20T10:58:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसात सुमारे 950 क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला. तालुक्यातील 66 शेतक:यांनी आतार्पयत आधारभूत केंद्रावर हरभरा टाकला आहे. या केंद्रावर मालाची प्रतवारी तपासून खरेदी होत असल्याने शेतक:यांना बाजार समितीत लिलाव सुरू होण्याची प्रतीक्षा लागून आहे.
शासनाच्या हमी भावाप्रमाणे हरभ:याची खरेदी करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवडय़ात आंदोलन केले होते. संघटनेने बाजार समितीत सुरू असलेल्या हरभरा लिलाव प्रक्रिया बंद पाडल्यापासून बाजार समितीचा व्यवहार ठप्प झाला आहे. बाजार समितीतील व्यापा:यांचे परवाने रद्द झाल्याने हमीभाव तर सोडाच कुठल्याही भावाने इतर व्यापारी हरभरा खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतक:यांची कोंडी झाली आहे.
हरभरा हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासनाचे एकच केंद्र खरेदी-विक्री संघात सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर दररोज सरासरी 100 क्विंटल हरभरा हमी भावाने खरेदी केला जात आहे. या केंद्रावर हमीभाव मिळत असूनही शेतक:यांकडून मात्र हरभरा आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणण्यासाठी निरूत्साह दिसून येत आहे. 5 एप्रिल ते 17 एप्रिलर्पयत या केंद्रावर केवळ 66 शेतक:यांनी 959.50 क्विंटल हरभरा टाकला आहे. या केंद्रावर नाफेडचा एक ग्रेडींग अधिकारी, मार्केट फेडरेशनचा एक प्रतिनिधी आणि खरेदी-विक्री संघाचा एक प्रतिनिधी अशा त्रिस्तरीय समितीकडून हरभरा खरेदी केली जात आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर हरभरा देण्यासाठी शेतक:यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी 7/12 उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकची ङोरॉक्स खरेदी विक्री संघात जमा करणे आवश्यक असल्याचे खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील यांनी ‘लोकमत’ला माहिती देतांना सांगितले.
याच केंद्रावरून यापूर्वी तूर खरेदी झाली होती. तालुक्यातील सुमारे 182 शेतक:यांनी दोन हजार क्विंटल तूर खरेदी केंद्रात हमीभावाने दिली आहे. शहादा व दोंडाईचा येथील वखार महामंडळाचे गोडावून हाऊसफूल असल्याने शहादा केंद्रावर खरेदी होणारा हरभरा नवापूर वखार महामंडळाच्या गोडाऊनला पाठविण्यात येत आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर प्रतवारी तपासून हरभरा खरेदी होत असल्याने खराब प्रतवारीचा हरभरा या केंद्रावर घेतला जाणार नाही ही कल्पना असल्याने कमी प्रतवारीचा हरभरा असलेले शेतकरी बाजार समिती कधी सुरू होते याकडे लक्ष ठेवून आहेत. तसेच बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या मालाला हमी भावापेक्षा चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असलेले शेतकरीही बाजार समितीत कधी लिलाव सुरू होतो याकडे डोळे लावून बसले आहेत.